खडकी येथे ‘एचबीटी’ बियाणे लागवड आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 21:36 IST2019-06-24T21:36:06+5:302019-06-24T21:36:33+5:30
शेतकरी संघटनेने सोमवारी लगतच्या खडकी येथे शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनाअंतर्गत अप्रमाणित जैविक संशोधित कपाशी बियाण्यांची राजू झोटींग यांच्या शेतात लागवड करण्यात आली. या आंदोलनामुळे कृषी विभागाची तारांबळ उडाली होती.

खडकी येथे ‘एचबीटी’ बियाणे लागवड आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
वडकी : शेतकरी संघटनेने सोमवारी लगतच्या खडकी येथे शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनाअंतर्गत अप्रमाणित जैविक संशोधित कपाशी बियाण्यांची राजू झोटींग यांच्या शेतात लागवड करण्यात आली. या आंदोलनामुळे कृषी विभागाची तारांबळ उडाली होती.
शेतकरी संघटनेने एचबीटी बियाणे लागवड आंदोलन करून शासनाला या बियाण्यांची परवानगी देण्याची मागणी केली होती. देशातील शेतकऱ्यांना शेतीत नवीन जैविक तंत्रज्ञानाने विकसित बियाणे निवडीचे स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. त्यासाठी सोमवारी राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे सीता मातेला साकडे घालून या बियाण्यांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खडकी येथील राजू झोटींग यांच्या शेतात एचबीटी बियाण्यांची लागवड करण्यात आली. हे आंदोलनामुळे रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा तयार होती. कृषी विभागासह महसूल विभाग आणि पोलीस कर्मचारीही शेतात पहारा देत होते.
आंदोलक बियाणे शेतात फेकून पसार झाले. कृषी विभागाने हे बियाणे ताब्यात घेतले. ते प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी दिली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक यांच्यासह कृषी व पोलीस कर्मचारी, तलाठी उपस्थित होते.
या आंदोलनात माजी आमदार अॅड. वामनराव चटप, सतीश दाणी, प्रज्ञा बापट, विजय निवल, बबनराव चौधरी, नितीन देशमुख, गणेश मुटे, कमलाकर भोयर, हेमराज इखार, अक्षय महाजन, गोपाल भोयर, राजेंद्र व्यापारी, कुंडलिक झोटींग, मंदा वाभिटकर, सिंधु इखार, सुमन काळे, यशोदा खेवले, सुमित्रा भोयर, चंद्रकला वाभिटकर, संगीता बचाटे, नारायण बोरकर, भास्कर पाटील, जीवन इखार, प्रदीप भोयर, किशोर राजूरकर, महेश आवारी, बंडू यरगुडे, गजानन ठाकरे, अमोल नंदूरकर, गोपाल नंदूरकर, विठ्ठल फटींग आदींनी सहभागी घेतला.