जिल्ह्याची पहिल्यांदाच यूपीएससीत हॅट्ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:12+5:30

आदिवासीबहुल आणि मागास जिल्हा म्हणून काहीसा दुर्लक्षित राहिलेला यवतमाळ जिल्हा गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांमध्ये चमकत आहे. अजहर, अभिनव आणि सुमित हे तीनही तरुण सर्वसामान्य कुटुंबातील असून प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत त्यांनी यश मिळविले आहे. अजहरला देश पातळीवर ३१५ वी, अभिनवला ६२४ वी आणि सुमितला ७४८ वी रँक मिळाली आहे.

Hattrick in UPSC for the first time in the district | जिल्ह्याची पहिल्यांदाच यूपीएससीत हॅट्ट्रिक

जिल्ह्याची पहिल्यांदाच यूपीएससीत हॅट्ट्रिक

Next
ठळक मुद्देदणदणीत कामगिरी : यवतमाळचा अजहर, वणीचा अभिनव, शिरपूरचा सुमित चमकला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी घोषित झाला आणि जिल्ह्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातील तीन तरुणांनी एकाच वेळी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. यवतमाळातील अजहर काझी, वणीतील अभिनव इंगोले आणि वणीच्याच शिरपूरमधील सुमित रामटेके या तिघांनी दणदणीत यश मिळविले.
आदिवासीबहुल आणि मागास जिल्हा म्हणून काहीसा दुर्लक्षित राहिलेला यवतमाळ जिल्हा गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांमध्ये चमकत आहे. अजहर, अभिनव आणि सुमित हे तीनही तरुण सर्वसामान्य कुटुंबातील असून प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत त्यांनी यश मिळविले आहे. अजहरला देश पातळीवर ३१५ वी, अभिनवला ६२४ वी आणि सुमितला ७४८ वी रँक मिळाली आहे. आता आयएएस, आयएफएस किंवा आयपीएस कॅडरमध्ये जावून हे तरुण देशसेवा करणार आहे.
अजहर यवतमाळच्या रचना कॉलनीतील रहिवासी असून काही वर्षापूर्वी त्याचे वडील काळीपिवळी चालक होते. त्याही गरिबीत त्याने २००६ मध्ये बारावीची परीक्षा जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. बँकेतील नोकरी सोडून दोन वर्ष दिल्लीत त्याने यूपीएससीचा अभ्यास केला. यावेळी त्याला आर्थिक अडचणीचा मोठा सामना करावा लागला. वडील आणि घरच्या मंडळींनी मोलाचा हातभार लावला. परीक्षेपूर्वीपासूनच टीव्ही पाहणे बंद केले होते. मला मोबाईलचा सर्वाधिक फायदा झाला, असे अजहरने सांगितले.
अभिनव इंगोले हा वणीच्या जनता विद्यालयातून निवृत्त झालेले पर्यवेक्षक प्रवीण इंगोले यांचा मुलगा आहे. सध्या तो मुंबईत सेबीमध्ये कार्यरत आहे. त्याचे आजोळ घाटंजी तालुक्यातील मुरली असून त्याच्या यशाने वणीसह घाटंजी तालुक्यातही आनंद व्यक्त केला जात आहे. सुमित रामटेके हा वणी तालुक्यातील शिरपूरचा रहिवासी आहे. त्याचे वडील सुधाकर हे गुरुदेव विद्यालयातून प्रयोगशाळा परिचर म्हणून निवृत्त झाले आहे. सुमितने यापूर्वीही यूपीएससी उत्तीर्ण करून सेंट्रल आर्म पोलीस फोर्समध्ये वर्ग-१ ची नोकरी मिळविली होती. तो दुसऱ्यांदा यशस्वी झाला.

यवतमाळ, वणीसह घाटंजीतही आनंदोत्सव
यूपीएससी उत्तीर्ण झालेला अभिनव इंगोले याचे आजोळ घाटंजी तालुक्यातील मुरली आहे. त्यामुळे त्याच्या यशाने वणीसह घाटंजी तालुक्यातही आनंदोत्सव साजरा केला जात आहे. अभिनवसह अजहर आणि सुमितचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Hattrick in UPSC for the first time in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.