तलवारबाजीत हर्षदाला तीन सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:12 IST2018-10-11T22:12:19+5:302018-10-11T22:12:34+5:30
येथील नेहरू स्टेडियमवरील राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय तलवारपटू हर्षदा गजानन दमकोंडावार हिने तीन सुवर्णपदक प्राप्त केले. १७ वर्षाच्या हर्षदाने ५२ वेळा राज्यस्पर्धेत सहभाग नोंदविला.

तलवारबाजीत हर्षदाला तीन सुवर्ण
यवतमाळ : येथील नेहरू स्टेडियमवरील राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय तलवारपटू हर्षदा गजानन दमकोंडावार हिने तीन सुवर्णपदक प्राप्त केले. १७ वर्षाच्या हर्षदाने ५२ वेळा राज्यस्पर्धेत सहभाग नोंदविला. तिने आतापर्यंत २१ सुवर्ण, ६ रजत, १४ कास्य पदक मिळविले आहे. सलग १२ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. तिने कॅडेड एशियन फेंसिग चॅम्पियनशीप दुबई, कॉमन वेल्थ गेम इंग्लंडमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. सरकारच्या ‘खेलो इंडिया खेलो’ या राष्ट्रीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या बळावर तिची भारतीय खेळ प्राधिकरण औरंगाबाद येथे विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. तुकाराम मेहेत्रा हे तिचे मार्गदर्शक प्रशिक्षक आहे.