ेउमरखेडमध्ये हरणाचा शिकारी गजाआड
By Admin | Updated: July 14, 2016 02:28 IST2016-07-14T02:28:16+5:302016-07-14T02:28:16+5:30
मराठवाड्यात हरणाची शिकार करून दुचाकीने घेवून जाणाऱ्या एकाला उमरखेड येथे वन नाक्यावर अटक करण्यात आली,

ेउमरखेडमध्ये हरणाचा शिकारी गजाआड
उमरखेड : मराठवाड्यात हरणाची शिकार करून दुचाकीने घेवून जाणाऱ्या एकाला उमरखेड येथे वन नाक्यावर अटक करण्यात आली, तर तीन जण पसार झाले आहे.
दिनेश अशोक जाधव (३०) रा.दिंडाळा ता.उमरखेड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने आपल्या तीन मित्राच्या सहकार्याने नांदेड जिल्ह्यातील निघवा परिसरात रात्री दोन हरण जिवंत पकडले. त्यानंतर त्यांना ठार करून एका पोत्यात घालून दुचाकीने उमरखेडकडे येत होते. उमरखेड येथील वन उपज तपासणी नाक्यावर कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी या दुचाकीचा पाठलाग करून पकडले. त्यातील दिनेश जाधव हा वन कर्मचाऱ्यांच्या हाती लागला. इतर तीन जण पसार झाले. पोते उघडून बघितले असता त्यात दोन हरण मृतावस्थेत आढळून आले. उपविभागीय वन अधिकारी एस.आर. दुमारे, वन परिक्षेत्र अधिकारी एम.के. तरटेकर, क्षेत्र सहाय्यक अजय बावने, जी.एन. शिंगणकर, एस.पी. बाभळे यांनी त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने हरणाची शिकार केल्याचे कबूल केले. (शहर प्रतिनिधी)