शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कष्टिक पोशिंद्याच्या पोरांचेच पोट गेले खपाटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 05:00 IST

उद्योगांची वाणवा असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या २७ लाख लोकसंख्येच्या उदरभरणाचा जिम्मा प्रामुख्याने चार लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी शिरावर घेतला आहे. हजारो शेतमजुरांच्या चुली याच पोशिंद्याच्या आसऱ्याने पेटत आहेत. आता सरकारी अनास्थेने या अन्नदात्याच्याच पोरांचे पोट खपाटीला गेले आहे. मागच्या वर्षी तुरी विकलेल्या अनेक कास्तकांना अजूनही पैसे मिळाले नाही. कितीही राबराबले तरी कापसाला भाव मिळत नाही. यंदा कापूस टाळून सोयाबीन पेरले तर पेरलेलेही उगवले नाही.

ठळक मुद्देकोरोनाने अनेकांचे ताट परावलंबी : साडेचार लाख शेतकऱ्यांवर २७ लाख लोकसंख्येचा भार, पण बेफाम जगणाऱ्यांना अन्नाच्या नासाडीची हौसच फार

 अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्त्यावरच्या भिकाऱ्यापासून तर एसी कारमधल्या कोट्यधीश उद्योजकापर्यंत साऱ्यांचाच दिवस उगवतो तो अन्नाच्या शोधात. कुणाला हात पसरावा लागतो, तर कुणाच्या घशात घास लोटावा लागतो.. पण ज्यांच्या कष्टातून अन्न उगवते, त्या शेतकऱ्यांच्या ताटातही यंदा तेलामिठाची सोय उरलेली नाही. कोरोनाने जगाला जेरीस आणले, थांबविले तेव्हा एकटा शेतकरी मात्र राबत होता. पण आता निसर्गाने त्याचाही घास हिरावलाय... शुक्रवारी जागतिक अन्न दिवस साजरा होत असताना पोशिंद्याच्या पोरांची अन्नान दशा मांडण्याचा हा प्रयत्न...उद्योगांची वाणवा असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या २७ लाख लोकसंख्येच्या उदरभरणाचा जिम्मा प्रामुख्याने चार लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी शिरावर घेतला आहे. हजारो शेतमजुरांच्या चुली याच पोशिंद्याच्या आसऱ्याने पेटत आहेत. आता सरकारी अनास्थेने या अन्नदात्याच्याच पोरांचे पोट खपाटीला गेले आहे. मागच्या वर्षी तुरी विकलेल्या अनेक कास्तकांना अजूनही पैसे मिळाले नाही. कितीही राबराबले तरी कापसाला भाव मिळत नाही. यंदा कापूस टाळून सोयाबीन पेरले तर पेरलेलेही उगवले नाही. ४ एकरात सव्वाशे किलो बियाणे पेरले अन् उगवले केवळ ५० किलो... ही घाटंजीतील भयकारक परिस्थिती नुकतीच ह्यलोकमतह्णने उघडकीस आणली. रक्त आटवून अन्न पिकविणाऱ्यांचे हाल असताना, विलासी जगणाऱ्यांनी मात्र अन्नाची नासाडी चालविली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आकडेवारीनुसार भारतात ४० टक्के अन्न वाया जाते. तर १९ कोटी नागरिक कुपोषित आहेत. ही दुर्दैशा टाळण्यासाठी अन्नाच्या कणा-कणाचा उपयोग करणे आणि तो पिकविणाऱ्यांचा सन्मान राखणे आवश्यक आहे... सामान्य माणसाने व सरकारमधल्या असामान्य माणसानेही!चवदार मिरच्या, लिंबाचे पोते, महागाचे तांदूळ फेकण्यात कसली धन्यता ?मेहनतीने पिकविण्यात आलेल्या शेतमालाची सरकार किंमत करीत नाही अन् सामान्य माणसेही बावळटपणे तो माल फेकण्यात धन्यता मानतात. दुकानांमध्ये ह्यउतरवूनह्ण फेकलेल्या लिंबांचा, मिरच्यांचा पसारा यवतमाळच्या रस्त्यावर दिसतो. चवदार आणि आरोग्यदायक असलेली ही फळे केवळ अंधश्रद्धेपायी मातीमोल होतात. शहराचा विचार करता पोतंभर तरी माल असाच वाया जात आहे. लग्नसमारंभात तर ही उधळपट्टी मोठ्या प्रमाणात चालते. चुमडंभर महाग तांदळाच्या अक्षता फेकून नासविल्या जातात. तर बुफे जेवणात अर्धी भरलेली प्लेट डस्टबिनमध्ये निर्लज्जपणे टाकली जाते. कहर म्हणजे ह्यफोडणी जरा जमलीच नाहीह्ण असे ढेकर देत म्हणताना ना पोरीच्या बापाचा विचार होत नाही कास्तकाराचा!लॉकडाऊनमध्ये भलेभले अन्नाला मोतादकोरोनामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असताना भलेभले अन्नाला मोताद झाले होते. तेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी धावपळ करीत हजारो लोकांच्या तोंडात घास पोचविला. धान्याच्या किट वाटप केल्या. सारेच उद्योगधंदे, दुकाने बंद असताना एकमेव शेतकरीच असा होता, जो लॉकडाऊनमध्येही अन्न उगविण्याच्या कामात व्यग्र होता. कारण लॉकडाऊननंतर बाजार उघडेलही, लोकांच्या खिशात पैसा येईलही.. पण बाजारात धान्यच आले नाही, तर जगणार कोण? या प्रश्नाचे उत्तर अन्नदात्याच्या घामातच आहे.पोळीपेक्षा भाकरीवर जोर !एकेकाळी ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख उत्पादन होते. पण आता ज्वारीची लागवडच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पूर्वी केवळ गरिबांच्याच ताटात दिसणाऱ्या भाकरीची आता गर्भश्रीमंतांनाही पोळीपेक्षा अधिक आस लागली आहे. पण माणसांनाच नव्हेतर ढोरांनाही ज्वारीचा कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. यासंदर्भात बोलताना कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे म्हणाले, आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीच्या उत्पादनावर भर द्यावा. कपाशीपेक्षा कमी खर्चात अधिक उत्पन्न यातून मिळू शकते. जनावरांच्या घटत्या संख्येलाही त्यामुळे आधार मिळेल. शिवाय ज्वारीची भाकर व इतर पदार्थ आरोग्यालाही पोषक आहेत. खाद्यतेलाची आयात करण्यामुळे देशाला बराच खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तेलवर्गीय पिकांची लागवड वाढवावी. विशेषत: तुरीला आता ६ हजारांचा हमीभाव जाहीर झाला आहे. रब्बीत करडई, जवस, तसेच उन्हाळी तिळाची लागवड फायदेशीर ठरू शकते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती