शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना दिवाळीची खुशखबर, शाळेत खिचडीसोबत बिस्कीटही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 05:00 IST

ही बिस्किटे ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन आणि तांदळापासून बनविलेली असतील. आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या या बिस्किटांना न्यूट्रिटिव्ह स्लाइस म्हटले जाणार आहे.  विशेष म्हणजे पाचही प्रकारचे स्लाइस २४ दिवसांसाठी एकाच वेळी विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहेत. आकर्षक पॅकिंग आणि मुलांना आवडणारी चव ही या स्लाइसची वैशिष्ट्ये राहणार आहेत. विशेष म्हणजे शिक्षण विभागाने स्लाइस पुरवठ्यासाठी जालना येथील एसआरजे फूडस् या संस्थेला नुकतीच ऑर्डरही दिली आहे. 

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शाळेत रोजरोज तीच-तीच खिचडी खाऊन कंटाळलेल्या मुलांसाठी खुशखबर आहे. दिवाळीनंतर शाळा सुरू होताच आता खिचडीसोबतच बिस्किटाचे पाच पुडेही मिळणार आहेत. मात्र, ही बिस्किटे ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन आणि तांदळापासून बनविलेली असतील. आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या या बिस्किटांना न्यूट्रिटिव्ह स्लाइस म्हटले जाणार आहे.  विशेष म्हणजे पाचही प्रकारचे स्लाइस २४ दिवसांसाठी एकाच वेळी विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहेत. आकर्षक पॅकिंग आणि मुलांना आवडणारी चव ही या स्लाइसची वैशिष्ट्ये राहणार आहेत. विशेष म्हणजे शिक्षण विभागाने स्लाइस पुरवठ्यासाठी जालना येथील एसआरजे फूडस् या संस्थेला नुकतीच ऑर्डरही दिली आहे. 

रुचकर चवीसोबतच आरोग्यदायकही

कोविडचे संकट पाहता शासनाचा निर्णय योग्यच आहे. शाळा स्तरावरही अंमलबजावणी उत्तम केली जाईल. मुलांच्या आरोग्यासाठी हे पदार्थ चांगले आहे. त्यामुळे मुलांकडूनही प्रतिसाद मिळेल. -गजानन हागे पाटील, शिक्षक

या स्लाईसची चव चांगली असून आरोग्यासाठीही ते चांगले आहे. त्याचे वाटप करणेही सोईस्कर आहे. हा माल खराब होत नाही. त्यामुळे या नव्या निर्णयाचे मनापासून स्वागतच आहे. - इनायत खान, मुख्याध्यापक

स्वयंपाकी करणार मदत 

- जालना येथून शाळा स्तरावर या बिस्कीट वजा न्यूट्रिटिव्ह स्लाइसचा पुरवठा होणार आहे. - हे सर्व पदार्थ शाळेत साठवून ठेवण्यासाठी, तसेच त्यांचे वाटप करण्यासाठी शाळेतील स्वयंपाकी मंडळींची मदत घेण्याचे निर्देश आहे. - त्यामुळे पोषण आहार स्वयंपाकी कायम राहतील. 

ऑर्डर दिली, लवकरच येईल  ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या रक्तात एचबी कमी आढळते. शाळेतून मिळालेल्या गोळ्याही मुले सहसा घेत नाहीत. त्यामुळे न्यूट्रिटिव्ह स्लाइसद्वारे त्यांना पोषक आहार दिला जाणार आहे. त्याची ऑर्डर दिली आहे.  -प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा