अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:15 IST2018-07-20T22:14:37+5:302018-07-20T22:15:43+5:30
चार वर्षीय बालिकेवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी तालुक्यातील राजकीय व सामाजिक संघटनांनी केली आहे. यासंदर्भात, शेकडो पुरूष व महिलांनी मारेगावचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांची भेट घेऊन आपली भावना व्यक्त केली.

अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : चार वर्षीय बालिकेवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी तालुक्यातील राजकीय व सामाजिक संघटनांनी केली आहे.
यासंदर्भात, शेकडो पुरूष व महिलांनी मारेगावचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांची भेट घेऊन आपली भावना व्यक्त केली. या घटनेतील आरोपी अनुराव आत्राम याने चार वर्षीय पुतणीसोबत अनैसर्गिक कृत्य केले होते. त्यानंतर तो पसार झाला होता. मारेगाव पोलिसांनी तीन पथके तत्काळ रवाना करून गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यात अटक केली.
आरोपीला पकडल्याचे वृत्त तालुक्यात पसरताच तालुक्यातील राजकीय व सामाजिक संघटनांच्या महिला व पुरूषांनी पोलीस ठाण्यात जाऊन रोष व्यक्त केला.
यावेळी ठाणेदार वडगावकर यांनी ठाण्यात जमलेल्या नागरिकांशी चर्चा केली. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.