पोलिसांच्या दंडुक्याने अर्धे गाव घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:13+5:30

कोरोना विषाणू तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. या टप्प्यात विषाणूची बाधा होण्यासाठी संपर्काचीही गरज नसते. त्याची लागण कुणालाही होऊ शकते. ही भीषण परिस्थितीही नागरिक समजून घेत नसल्याचे चिंताजनक चित्र वणीत पहायला मिळते. संचारबंदी लागू असतानाही अनेकजण कारण नसताना मंगळवारी सकाळी रस्त्यांवर फिरताना दिसून आले.

Half a village home with a police knock | पोलिसांच्या दंडुक्याने अर्धे गाव घरात

पोलिसांच्या दंडुक्याने अर्धे गाव घरात

Next
ठळक मुद्देवणी शहर : रस्त्यावर उनाडक्या करणाऱ्या तरूणांना फटके, गस्त वाढविली

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वारंवार विनंत्या करूनही लोक अकारण रस्त्यावर येत असल्याने अखेर मंगळवारी वणी पोलिसांना आपला खाक्या दाखवावा लागला. उनाडक्या करत रस्त्यावर भटकणाऱ्या अनेकांना दंडुके लगावल्यानंतर काही वेळातच, रस्त्यांवर शुकशुकाट पसरला. पोलिसांच्या दंडुक्याची अनुभूती घेतल्यानंतर नागरिकांनी आपापल्या घरात राहणे पसंत केले. त्यामुळे वणी शहरात सकाळी १० वाजतानंतर बऱ्यापैकी परिस्थिती आटोक्यात आली.
कोरोना विषाणू तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. या टप्प्यात विषाणूची बाधा होण्यासाठी संपर्काचीही गरज नसते. त्याची लागण कुणालाही होऊ शकते. ही भीषण परिस्थितीही नागरिक समजून घेत नसल्याचे चिंताजनक चित्र वणीत पहायला मिळते. संचारबंदी लागू असतानाही अनेकजण कारण नसताना मंगळवारी सकाळी रस्त्यांवर फिरताना दिसून आले. ही बाब लक्षात येताच, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, ठाणेदार वैैभव जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरलेत. नेहमी गजबजून राहणाºया टिळक चौैकात नाकाबंदी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आपला खाक्या दाखविण्यास सुरूवात करताच, लोक सैैरावैरा पळू लागले. अवघ्या काही वेळातच रस्ते निर्मणुष्य झाले. दुपारी वणीतील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. सायंकाळी मात्र पुन्हा नागरिक दुचाकीद्वारे वणीच्या रस्त्यावर फिरताना दिसून आलेत. मात्र जे लोक कारणाने बाहेर पडले, त्यांना पोलिसांनी सूट दिली. मात्र इतरांना दंडुके खावे लागले.

होम क्वारंटाईन असणाऱ्यावर कारवाई
वणी शहरात होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी हा आकडा ४१० वर पोहचला. मात्र यांपैैकी अद्याप कुणामध्येही कोरोनाची लक्षणे आढळली नाही. या सर्वांना ‘होम क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. यांपैैकी दुबईतून परत आलेला एक व्यक्ती घराबाहेर पडत असल्याचे दिसताच, मंगळवारी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी कलम १८८, २६९ अन्वये कारवाई केली. घरात राहण्याचा सल्ला दिल्यानंतरही काही लोक बाहेर फिरत असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Half a village home with a police knock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.