शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी अर्धेअधिक कर्मचारी ठरले ‘लेटलतिफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

वणी तहसील कार्यालय व पंचायत समितीत अर्धेअधिक कर्मचारी सोमवारी पहिल्याच दिवशी ‘लेटलतीफ’ ठरले. या उलट प्रमुख अधिकाऱ्यांनी मात्र वेळेचे बंधन पाळून सकाळी ९.३० वाजताच कार्यालयात ‘दस्तक’ दिली. सोमवारी ‘लोकमत’ने या विषयात स्टींग ऑपरेशन केले. ठिक ९.३५ वाजता ‘लोकमत’ च्या दोन वेगवेगळ्या चमू अनुक्रमे तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात पोहचल्या. तहसील कार्यालयात तहसीलदार श्याम धनमने यांच्यासह चारपैैकी दोन नायब तहसील हजर होते. यासोबतच बोटावर मोजण्याइतके कर्मचारी उपस्थित होते.

वणी : शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसांचा आठवडा केला. कामकाजाचा आठवडा संपल्यानंतर शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या सलग रजा उपभोगल्यानंतर सोमवारी शासकीय कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळी म्हणजे ९.४५ वाजता कार्यालयात पोहचणे अपेक्षित होते. परंतु वणी तहसील कार्यालय व पंचायत समितीत अर्धेअधिक कर्मचारी सोमवारी पहिल्याच दिवशी ‘लेटलतीफ’ ठरले. या उलट प्रमुख अधिकाऱ्यांनी मात्र वेळेचे बंधन पाळून सकाळी ९.३० वाजताच कार्यालयात ‘दस्तक’ दिली. सोमवारी ‘लोकमत’ने या विषयात स्टींग ऑपरेशन केले. ठिक ९.३५ वाजता ‘लोकमत’ च्या दोन वेगवेगळ्या चमू अनुक्रमे तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात पोहचल्या. तहसील कार्यालयात तहसीलदार श्याम धनमने यांच्यासह चारपैैकी दोन नायब तहसील हजर होते. यासोबतच बोटावर मोजण्याइतके कर्मचारी उपस्थित होते. तहसीलच्या प्रत्येकच विभागात एक, दोन कर्मचारी फाईली हुसकत तर काही कर्मचारी मोबाईलमध्ये गुंतून असल्याचे दिसून आले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात एसडीओ डॉ.शरद जावळे यांच्यासह त्यांचे काही कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले.स्वाक्षरी करून कर्मचारी बाहेर१० वाजतानंतर वणी तहसील कार्यालयात एकेकाने कर्मचाऱ्यांचे आगमन होत होते. मस्टरवर स्वाक्षरी करून काही कर्मचारी चहा पिण्यासाठी कार्यालयाबाहेर पडताना दिसले. वणीतील तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाच्या इमारती आमने-सामने आहेत. त्यामुळे या परिसरात नागरिकांची दररोजच मोठी गर्दी पहायला मिळते.वणी पंचायत समितीत अभियंत्यांना ‘लेटमार्क’वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश गायनर हे स्वत: ९.३० वाजता कार्यालयात येऊन बसले. परंतु ठरवून दिलेल्या वेळेत बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर होते. येथील दोन कनिष्ठ अभियंते १० वाजतानंतरही कार्यालयात पोहचले नव्हते. तसेच लेखा विभागातील दोन कर्मचारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, दोन लिपीकांना पहिल्याच दिवशी लेटमार्क मिळाला. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी राजेश गायनर यांनी सांगितले.वणी तहसील कार्यालयातील १२ कर्मचाऱ्यांना नोटीसदोन दिवसांच्या सलग सुट्या उपभोगल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी वणी तहसील कार्यालयात उशिरा पोहचणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना तहसीलदार श्याम धनमने यांनी नोटीस बजावली. यात चार अव्वल कारकून व आठ कनिष्ठ लिपीकांचा समावेश आहे. येथील तहसील कार्यालया १० अव्वल कारकून व १६ कनिष्ठ लिपीक आहेत.