सखी मंचच्यावतीने हळदीकुंकू कार्यक्रम

By Admin | Updated: February 9, 2016 02:12 IST2016-02-09T02:12:23+5:302016-02-09T02:12:23+5:30

लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने आणि प्रकृती जियोफ्रेश प्रायोजित सखींसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन ...

Haldikuncu Program on Sakhi Forum | सखी मंचच्यावतीने हळदीकुंकू कार्यक्रम

सखी मंचच्यावतीने हळदीकुंकू कार्यक्रम

१२ फेब्रुवारीला आयोजन : प्रकृती जियोफ्रेशचे सहकार्य
यवतमाळ : लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने आणि प्रकृती जियोफ्रेश प्रायोजित सखींसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन येथील दर्डा मातोश्री सभागृहात १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळात करण्यात आले आहे. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
मकर संक्रांत हा खास महिलांचा सण. या सणातून संस्कृती संवर्धन व्हावे आणि सखींच्या कलागुणांना चालना मिळावी म्हणून हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बिस्कीट, चहा पावडर, साखरेपासून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बिस्कीट कोणतेही चालेले, चुरा मात्र चालणार नाही. तसेच साखर ही पिठी साखर नसावी, चहा पावडरचा वापर करावा लागेल.
सजावटीसाठी कप-बशीव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूचा वापर करता येणार नाही. या स्पर्धेसाठी दोन फुट बाय दोन फुटची जागा स्पर्धास्थळी दिली जाईल. या स्पर्धेसाठी ३० मिनीटांचा वेळ राहणार आहे.
दुसरी स्पर्धा तिळापासून टिकली बनविणे आहे. कपाळाला लावायची टिकली पाच वेगवेगळ््या आकारात (शेप) मध्ये तयार करावी लागेल. यात कुंदन, रंग आणि जास्तीत जास्त तिळाचा वापर आवश्यक आहे. टिकली घरुन तयार करून आणावी. कार्यक्रमस्थळी मांडणीसाठी पाच मिनिटांचा वेळ दिला जाईल. दोन्ही स्पर्धेेसाठी लागणारे साहित्य घरून आणणे आवश्यक आहे. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय पुरस्कार दोन्ही स्पर्धेसाठी दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधी नावे नोंदवावे लागेल. या स्पर्धेत केवळ २०१६ मध्ये सदस्य झालेल्या सखींनाच सहभागी होता येईल. सखी मंच सदस्य होणाऱ्या पहिल्या ५०० सदस्यांना घरकूल मसाले पाकीट देण्यात येईल. तसेच सर्व सखी मंच सदस्यांना ‘माय फिटनेस बुक’ देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात चंद्रपूर येथील सखी ज्वेलर्स करून सिलव्हर प्लेटेड कुयरी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन लोकमत सखीमंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केली आहे. प्रकल्प अधिकारी म्हणून सुरूची खरे (७७६८९७६६८८), अपर्णा परसोडकर (९५५२३८३०७०), रेखा गांधी (९४०४५२४४३७), शैलजा दरक (९४०३२६५४२८), शिल्पा नथवानी (९४०३६१२५००), प्राप्ती गांधी (७७९८२३७०७०), दीपा तम्मेवार (९६८९९९२५०३), शुभदा हातगावकर (९८९०७७९४३४), स्मीता गंधे (८८८८४८४५७०) या राहतील.
अधीक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ८६००६१०७०६ या क्रमांकावर संपर्क साधवा. कार्यक्रमस्थळी सदस्य नोंदणी सुरू राहील. (उपक्रम प्रतिनिधी)

Web Title: Haldikuncu Program on Sakhi Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.