व्यायामशाळा अनुदानात क्रीडा संस्थांना डावलले

By Admin | Updated: September 21, 2014 23:58 IST2014-09-21T23:58:06+5:302014-09-21T23:58:06+5:30

राजकीय दबावाला बळी पडत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने १०३ ग्रामपंचायतींना कोट्यवधींची खैरात वाटली. मात्र हे करताना क्रीडा संस्थांना बाजूला ठेवण्यात आले. २०१३-१४ मध्ये व्यायाम शाळा

Gymnasium for sports giants | व्यायामशाळा अनुदानात क्रीडा संस्थांना डावलले

व्यायामशाळा अनुदानात क्रीडा संस्थांना डावलले

यवतमाळ : राजकीय दबावाला बळी पडत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने १०३ ग्रामपंचायतींना कोट्यवधींची खैरात वाटली. मात्र हे करताना क्रीडा संस्थांना बाजूला ठेवण्यात आले. २०१३-१४ मध्ये व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेंतर्गत या ग्रामपंचायतींना प्रत्येकी दोन लाखांचा निधी मिळणार आहे. निधी मंजूर करतानाच हा घोळ घातला आहे. व्यायामशाळा साहित्य खरेदीही ग्रामपंचायतीच करणार असल्याने यात नेमके काय होणार याकडे लक्ष राहणार आहे.
व्यायामशाळा विकास अनुदान प्राप्त जिल्ह्यातील ग्रामपंचायती अशा आहेत. पुसद : ज्योतीनगर, सावंगी, जामनाईक क्र.१, माळआसोली, निंभी (कवडीपूर), हुडी (बु.), वरुड (अश्विननगर), सावरगाव (ब्र.), जमशेटपूर, जगपूर, कारला, रामपूर (नगर), लोहरा (ई), हिवळणी (त.), आडगाव, रोहडा, गट ग्रामपंचायत निंबी (कवडीपूर). दारव्हा : निंभा, पालोदी, चिखली (राम), तरनोळा (रगड), करंजगाव, मांगकिन्ही, तरनोळी, महागाव कसबा, लोही, लाख (खिंड), लाडखेड, बोरी (बु.), कोहळा, गोरेगाव, कोलवाई, बानायत, हातोला, ब्रह्मी, कोलवाई गाव, मानकी, टाकळी, गोंडेगाव, दुधगाव, सांगवी रेल्वे, कुऱ्हाड. दिग्रस : डेहणी, साखरा, वरंदळी, तांडा. वणी : येनक, धोपटाळा, मंदर, निंभा, तेजापूर. पांढरकवडा : दहेली तांडा, आलोडा तांडा, घाटंजी : वासरी, शिवणी, डांगरगाव. यवतमाळ : सायखेडा, किटा, वाटखेड, लोणी, घोडखिंड, अर्जुना, भारी (कोलाम चावडी), जवळा, पारवा, बारडगाव, किन्ही. राळेगाव : लोहारा, सरई, खडकी, नागठाणा, कळमनेरगाव, चिकणा, जळका, रिधोरा, मंगी, मेंगापूर, आष्टा. बाभूळगाव : सावंगी मा., कोंढा, लोणी, पिंपरी (ई.). केळापूर : कारेगाव (रामपूर), वरूड (वलीदपूर), रामपूर, पिंपरी (बोरी), रुंदावन, टाकळी, रुंझा, अकोली (खु.), घोन्सी. कळंब : बोरीमहल. झरी जामणी : येळद (गाडेघाट), चिचघाट, शिबला, पाचपोड, चिखलडोह, गाव कोंडी, खरबडागाव, रायपूर, येडसी. महागाव : पिंपळगाव (कान्हा), माळेगाव, गुंज. मारेगाव : हाकापूर गाव नेर. उमरखेड : कृष्णापूर. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Gymnasium for sports giants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.