परप्रांतातून गुटखा यवतमाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 09:50 PM2019-02-04T21:50:01+5:302019-02-04T21:50:24+5:30

दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या सारख्या राज्यांमधून यवतमाळात प्रतिबंधित गुटखा पाठविला जात आहे. पोलीस व अन्न-औषधी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गुटख्याची ही तस्करी, वाहतूक, विक्री राजरोसपणे सुरू आहे. यातून मिळणाऱ्या लाभाचे पाट दूरपर्यंत वाहत आहेत.

Gutkha Yavatam from Paranetan | परप्रांतातून गुटखा यवतमाळात

परप्रांतातून गुटखा यवतमाळात

Next
ठळक मुद्देखामगाव-कारंजा मुख्य केंद्र : जिल्ह्यात तालुका मुख्यालयी गोदामे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या सारख्या राज्यांमधून यवतमाळात प्रतिबंधित गुटखा पाठविला जात आहे. पोलीस व अन्न-औषधी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गुटख्याची ही तस्करी, वाहतूक, विक्री राजरोसपणे सुरू आहे. यातून मिळणाऱ्या लाभाचे पाट दूरपर्यंत वाहत आहेत.
वाशिम येथे दोन दिवसांपूर्वी २० लाख ६२ हजार ५०० रुपये किंमतीचा गुटखा साठा आयपीएस अधिकाºयाच्या धाडीत ट्रकमधून जप्त करण्यात आला. या प्रकरणात काहींना अटक झाली असली तरी गुटख्याचा मुख्य सूत्रधार खामगावातील उमेश अद्याप रेकॉर्डवर आलेला नाही. भादंवि ३२८ कलमान्वये त्याला आरोपी बनविले जाण्याची प्रतीक्षा आहे.
पोलिसांकडून अनेकदा त्याचा माल पकडला जातो. मात्र चालक-वाहकांवरच कारवाई थांबत असल्याने पोलिसांचे हात उमेशपर्यंत कधी पोहोचल्याचे ऐकिवात नाही. उमेश हा राज्याचा सुपर स्टॉकीस्ट आहेत. तो दिल्लीतून प्रतिबंधित गुटख्याचा साठा बोलावितो. अनेक प्रकरणात कंपन्यांऐवजी तो डिलिंगसाठी पुढाकार घेत असल्याचे सांगितले जाते.
एका राजकीय पक्षाच्या अशोक नामक कार्यकर्त्याचे त्याला पाठबळ आहे. त्याचे मध्यप्रदेशातील महाराष्टÑ सीमेलगत बºहाणपुरात गोदाम आहे. तेथून लगतच्या जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा पुरवठा करण्यात येतो. यवतमाळात संतोष हा त्याचा डिलर आहे. राज्यात सर्वत्र उमेशच्या साखळीतूनच गुटख्याचा पुरवठा केला जातो. वाशिम पोलिसांनी उमेशच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढल्यास महाराष्टÑच नव्हे तर परप्रांतातील नेटवर्कही उघड होण्यास वेळ लागणार नाही. यवतमाळ-अमरावतीपासून सर्वदूर त्याचाच गुटखा पोहोचविला जातो.
कारंजा हे गुटख्याचे दुसरे प्रमुख केंद्र आहे. फिरोज हा त्याचा कर्ताधर्ता आहे. त्याचा भागीदारही लगतच्या मोठ्या शहरात आहे. त्याच्याकडे हैदराबाद-कर्नाटक येथून प्रतिबंधित गुटखा येतो. यवतमाळ जिल्ह्यात वणी, यवतमाळ, पुसद, दारव्हा, महागाव, आर्णी, उमरखेड येथे तसेच वाशिममधील मालेगाव व अन्य काही ठिकाणी फिरोजचे गुटख्याचे गोदाम आहे. सागर व आरके हा त्याचा ब्रँड असून तो विदर्भ-मराठवाड्यासह सर्वत्र पोहोचविला जातो. जेथे गोदाम तेथील पोलीस अधिकाºयाला गुटख्याच्या या व्यवसायात भागीदार बनविण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या माध्यमातून तो पोलिसांना मॅनेज करतो.
प्रतिबंधित गुटख्यावर कारवाईची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनाची आहे. मात्र आमच्याकडे मनुष्यबळ नाही, असे कारण पुढे करीत हा विभाग हातवर करतो. तर पोलीस आम्हाला कारवाईचे अधिकार नाही, असे सांगून शक्यतोवर डोळेझाक करते. कधी टीपवरून गुटख्याचा ट्रक पकडला गेल्यास एफडीएला पाचारण केले जाते. मुळात गुटख्याच्या या ‘अर्थ’कारणात या दोन्ही विभागातील अनेकांचे हात ओले झाले आहेत.
‘गोड’ बोलून कारवाईला बगल
अमरावती विभागात अन्न व औषधी प्रशासनाच्या अनेक उद्योग-व्यावसायिकांच्या डील ‘गोड’बोलून केल्या जातात. त्यासाठी थेट पुणे कनेक्शन वापरले जाते. गुटखाच नव्हे तर अन्न व औषधी प्रशासनाच्या अखत्यारीत येणाºया अनेक बाबींची परस्परच दुकानदारी केली जाते. मात्र त्यासाठी ‘गोड’बोलण्याचे पथ्य पाळले जाते.

Web Title: Gutkha Yavatam from Paranetan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.