शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजी, शाळेत शिकवा, शेती पिकवा अन् दहा हजार मिळवा; अनोखी स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 08:29 IST

शालेय परसबागांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातील शाळांसाठी अनोखी स्पर्धा

- अविनाश साबापुरे

यवतमाळ : शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना आता अध्यापनासोबतच शाळेच्या परिसरात शेती पिकविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. शाळेच्या परिसरात परसबाग फुलवून तेथील भाजीपाला शालेय पोषण आहारामध्ये वापरला जावा, असा उद्देश ठेवून शासनाने राज्यभरातील शाळांसाठी परसबाग स्पर्धा घोषित केली आहे. 

केंद्र शासनाने शालेय पोषण आहार योजनेला आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे नवे नाव दिले असून, योजनेत अनेक बदल सुचविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शाळेच्या परसबागेतील भाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या आहारात समावेश केला जाणार आहे. 

या परसबागेत भाजीपाला तसेच फळझाडांची लागवड करावी. त्यातील भाजीपाला व फळे विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वापरावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना ताजा भाजीपाला व फळे मिळाल्याने ते अधिक आनंदाने शालेय पोषण आहार सेवन करतील, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी जिल्हा परिषदांना लेखी निर्देश देताना नमूद केले आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून स्पर्धा सुरू होतील.  

असे आहे स्पर्धेचे स्वरूप

यात सर्वप्रथम केंद्र स्तरावरून उत्तम परसबागांची निवड केली जाणार असून, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तालुकास्तरीय परसबाग स्पर्धा होईल व जानेवारीच्या अखेरीस जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे. nयामध्ये तालुका स्तरावर प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार व तृतीय २ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, तर जिल्हा स्तरावर अनुक्रमे १० हजार, सात आणि पाच हजारांचे बक्षीस मिळविण्याची प्रत्येक शाळेला संधी आहे. 

शेतकरी ठरवणार परसबागेची गुणवत्ता

या स्पर्धेत कोणत्या शाळेची परसबाग उत्तम आहे. याचा निर्णय घेण्यासाठी प्रगतिशील शेतकऱ्याच्या नेतृत्वात समिती नेमली जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांसह अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी तसेच महिला बालविकास खात्याचे प्रतिनिधीही राहणार आहेत.

असे असतील निकष

स्पर्धेमध्ये १०० गुणांचे निकष तपासले जातील. परसबागेची रचना, हवामानानुसार भाज्यांची लागवड, देशी वाणांचा वापर, कमी पाणी लागणाऱ्या भाज्या, सिंचन पद्धत, सेंद्रिय परसबाग, विद्यार्थ्यांचा सहभाग आदी निकषांना गुण दिले जाणार आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकFarmerशेतकरी