बोथ येथे गुलाबी बोंडअळीवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST2019-09-12T06:00:00+5:302019-09-12T06:00:10+5:30

शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीबाबत जागृत राहून निरीक्षण करावे, एकात्मिक कीड व्यवस्थापनात गुलाबी बोंडअळीग्रस्त फुले तोडून अळीसह नष्ट करावी. एकरी पाच ते सहा कामगंध सापळे लावावे. निंबोळी अर्काची फवारणी करावी. पात्यांच्या अवस्थेपासून एकरी तीन ट्रायकाकार्डचा वापर करावा.

Guide to the Pink Bondi at Booth | बोथ येथे गुलाबी बोंडअळीवर मार्गदर्शन

बोथ येथे गुलाबी बोंडअळीवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यातील बोथ येथे कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी भेट देऊन शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.विपुल शहा, विस्तार अधिकारी वासुदेव चांदुकर, शेतकरी रामकृष्ण गावंडे, पवन काळे, गोपाल गावंडे, अशोक ठाकरे, संतोष वानखडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ.शहा यांनी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीबाबत जागृत राहून निरीक्षण करावे, एकात्मिक कीड व्यवस्थापनात गुलाबी बोंडअळीग्रस्त फुले तोडून अळीसह नष्ट करावी. एकरी पाच ते सहा कामगंध सापळे लावावे. निंबोळी अर्काची फवारणी करावी. पात्यांच्या अवस्थेपासून एकरी तीन ट्रायकाकार्डचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना ब्युव्हेरीयाबँसीयाना या जैविक बुरशीनाशकाची ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तसेच बांधावर असणाऱ्या किडींच्या पर्यंयी खाद्य वनस्पती अंबाडी, रानभेंडी नष्ट कराव्या. शेतात एकरी १५ ते २0 पक्षी थांबे लावावे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Guide to the Pink Bondi at Booth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती