‘जेडीआयईटी’त मार्गदर्शन कार्यशाळा
By Admin | Updated: March 7, 2017 01:26 IST2017-03-07T01:26:16+5:302017-03-07T01:26:16+5:30
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण या अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली.

‘जेडीआयईटी’त मार्गदर्शन कार्यशाळा
यवतमाळ : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण या अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडली.
प्रमुख अतिथी म्हणून अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापक तथा विभाग प्रमुख डॉ. सुप्रभा यादगीरवार लाभल्या होत्या. ‘जेडीआयईटी’चे परमाणू व दूरसंचार विभाग प्रमुख डॉ. एस.एम. गुल्हाने अध्यक्षस्थानी होते. तक्रार समितीच्या अध्यक्ष प्रा. रिना पानतावणे आदींची मंचावर उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ. सुप्रभा यादगीरवार यांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ च्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. यासोबतच अधिनियम २०१३ प्रमाणे लैंगिक छळाची परिभाषा व तसे घडल्यास कधी कोणी व कुठे तक्रार करावी याबाबत सांगितले.
संचालन श्रृती येरकर हिने केले. प्रास्ताविक रिना पानतावणे यांनी तर आभार ऐश्वर्या गोटेकर हिने मानले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार, प्रा. पद्मिनी कौशिक, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. जागृती वानखेडे, अकाऊंट आॅफीसर रवीन सिंग, अधीक्षक नवघरे, प्रा. सोनल सावरकर, विद्यार्थी हर्षल वानरे, मयूर पुल्लकवार, अंकुश शेंडे, नेहा पाटील, शंतनू खट्टी, अक्षय पुडके, पायल दुधभल्ले, मयुरी शिरभाते, अश्विनी श्रीरंग, रोहिणी गिरी, प्रतीक्षा जिचकार आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)