सखी मंचच्यावतीने ‘पांढरे डाग’ विषयावर मार्गदर्शन शिबिर

By Admin | Updated: August 22, 2014 00:08 IST2014-08-22T00:08:42+5:302014-08-22T00:08:42+5:30

लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्यावतीने आणि डॉक्टर्स असोसिएशनच्या सहकार्याने ‘पांढरे डाग’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन २४ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता येथील

Guidance Camp on "White Box" on Sakthi Forum | सखी मंचच्यावतीने ‘पांढरे डाग’ विषयावर मार्गदर्शन शिबिर

सखी मंचच्यावतीने ‘पांढरे डाग’ विषयावर मार्गदर्शन शिबिर

यवतमाळ : लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्यावतीने आणि डॉक्टर्स असोसिएशनच्या सहकार्याने ‘पांढरे डाग’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन २४ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता येथील दर्डा मातोश्री सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी पुणे येथील डॉ. माया तुळपुळे मार्गदर्शन करणार असून, ‘नितळ’ चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला आहे.
शरीरावर येणाऱ्या पांढऱ्या डागांना इंग्रजीत ल्युकोडर्मा असे म्हणतात. पांढरे डाग असणाऱ्या व्यक्तीला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. खरे तर शरीरावरील पांढरे डाग म्हणजे कोणताही आजार नाही. शरीरात रंगाच्या काही कोषीका असतात त्या त्वचेचा रंग सावळा किंवा गोरा करतात. या कोषीकांना शरीर स्वत:हूनच नष्ट करतो. जेव्हा कोषीकांची संख्या कमी होते तेव्हा शरीरावर पांढरे डाग दिसने सुरू होतात. त्वचेवर असणाऱ्या या डागांचा इतर भागावर मात्र कोणताही परिणाम होत नाही. परंतु हा आजार झाला की, पीडित व्यक्ती निराशाजनक होते. अशा व्यक्तींमध्ये आशेचा नवा किरण निर्माण करण्याचा प्रयत्न पुणे स्थित श्वेता असोसिएशन करीत आहे. त्याअंतर्गतच यवतमाळात या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. माया तुळपुळे या जनरल
सर्जरीमध्ये एम.एस. असून, विविध ठिकाणी त्यांनी मार्गदर्शनही केले
आहे.
याचवेळी डॉ. माया तुळपुळे प्रस्तुत आणि सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर कृत ‘नितळ’ हा चित्रपट दाखविला जाईल. या चित्रपटात विक्रम गोखले, विजय तेंडुलकर, रिमा, निना कुलकर्णी, अमृता सुभाष यांच्यासह प्रतीथयश कलावंतांनी भुमिका साकरली आहे.
समाजाची पांढऱ्या डाग असलेल्या व्यक्तीप्रती असलेली नकारात्मक भुमिका बदलून आणि पीडित व्यक्तीमध्ये आशेचा नवा किरण निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकमत सखी मंच आणि डॉक्टर असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.
(उपक्रम प्रतिनिधी)

Web Title: Guidance Camp on "White Box" on Sakthi Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.