तळेगाव शिवारात रखवालदाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 16:57 IST2019-02-10T16:57:23+5:302019-02-10T16:57:27+5:30
शहरातील पांढरकवडा मार्गावरील तळेगाव शिवारात गिलानी यांच्या शेतात एका ५० वर्षीय इसमाची धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली.

तळेगाव शिवारात रखवालदाराचा खून
यवतमाळ: शहरातील पांढरकवडा मार्गावरील तळेगाव शिवारात गिलानी यांच्या शेतात एका ५० वर्षीय इसमाची धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना आज दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सुधाकर आनंदराव आत्राम रा. तळेगाव असे मृतकाचे नाव असून तो गिलानी यांच्या शेतात गेल्या चार वर्ष्यापासून राखवालीचे काम करीत होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी अधिकारी पियुष जगताप, ग्रामीण पोलीस ठाण्यातील एपीआय पाचकवडे, टोळी विरोधी पथकाचे प्रमुख संतोष मनवर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जुन्या वादाच्या कारणावरून ही हत्या झाल्याचा संशय पोलीसांकडून वर्तविण्यात येत आहे.