पालकमंत्र्यांनी घेतली ममता तातेड यांची भेट
By Admin | Updated: October 25, 2015 02:24 IST2015-10-25T02:24:34+5:302015-10-25T02:24:34+5:30
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील आणि आमदार डॉ. अशोक उईके यांनी येथील अग्रगण्य व्यवसायी...

पालकमंत्र्यांनी घेतली ममता तातेड यांची भेट
बाभूळगाव : यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील आणि आमदार डॉ. अशोक उईके यांनी येथील अग्रगण्य व्यवसायी इंदरचंद तातेड यांच्या निवासस्थानाला शनिवारी भेट दिली. तातेड यांच्या सून ममता नवीनचंद तातेड यांनी ३१ उपवास केल्याबद्दल त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
ममता तातेड यांनी उपवास केल्यामुळे मंत्रीव्दय त्यांच्या भेटीसाठी याठिकाणी आले होते. याप्रसंगी आनंद दर्डा, नवीन तातेड, हंसराज भन्साली, इंदरचंद तातेड यांनी मंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, परमानंद अग्रवाल, राजेंद्र डांगे, अमन गावंडे, मनोहरराव
बुरेवार, सतीश मानलवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)