लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात पसरलेल्या थंडीच्या लाटेने रबी पिकाला फटका बसला आहे. त्यातच धुक्याने हरभराचे पीक होरपळले आहे. केळीलाही फटका बसला आहे. तर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यवतमाळ जिल्ह्यात तापमानाचा पारा ९ अंश सेल्सीअसपर्यंत खाली गेला आहे. ग्रामीण भागात यापेक्षाही अधिक थंडी आहे. हा प्रचंड गारवा पिकांना सहन होत नसल्याने हरभऱ्याला मोठा फटका बसण्यास सुरूवात झाली. हरभऱ्याचे पीक होरपळले आहे. हरभरा अचानक पिवळा पडल्याने शेतकरी धास्तावले आहेत. यावर कुठल्या उपाययोजना कराव्या याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.केळीला थंडी सहन न झाल्याने पाने पिवळी पडली आहेत. भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला आहे. मिरचीचा फुलोरा प्रभावित झाला आहे. मिरचीचे उत्पादन घटण्याचा धोका आहे. दरवर्षी रबी पिकांना उपयुक्त ठरणारी थंडी यंदा प्रमाणपेक्षा अधिक असल्याने घातक ठरत आहे. या परिस्थितीचा सामना कसा करावा, याबाबत कृषी विभागाकडूनही मार्गदर्शन केले जात नाही.
धुक्याने चणा करपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:23 IST
सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात पसरलेल्या थंडीच्या लाटेने रबी पिकाला फटका बसला आहे. त्यातच धुक्याने हरभराचे पीक होरपळले आहे. केळीलाही फटका बसला आहे. तर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
धुक्याने चणा करपला
ठळक मुद्देपारा ९ अंशावर : भाजीपाल्याचे नुकसान