घाटंजी येथे अभिवादन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:49 IST2021-03-01T04:49:44+5:302021-03-01T04:49:44+5:30

प्रमुख वक्ते सुनील नगराळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान समितीत जाण्याचा मार्ग बंद झाल्यानंतर त्यांना निवडून आणण्यासाठी जाणीवपूर्वक जोगेंद्रनाथ ...

Greetings program at Ghatanji | घाटंजी येथे अभिवादन कार्यक्रम

घाटंजी येथे अभिवादन कार्यक्रम

प्रमुख वक्ते सुनील नगराळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान समितीत जाण्याचा मार्ग बंद झाल्यानंतर त्यांना निवडून आणण्यासाठी जाणीवपूर्वक जोगेंद्रनाथ मंडल यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यावेळेस त्यानी हे योगदान दिले नसते, तर डॉ.बाबासाहेब त्या समितीत पोहोचू शकले नसते, असे स्पष्ट केले. अध्यक्ष बी.टी. वाढवे यांनी जोगेंद्रनाथ मंडल यांच्या जीवन चरित्राची माहिती दिली.

यावेळी दादाराव खोब्रागडे, अजय गजभिये, राहुल वाळकेे, मनोज रामटेके, प्रतीक पाटील, सचिन रामटेके, दुधनाथ गजभिये, संजय घुसे, सूर्यकांत ढोके, प्रवीण मेश्राम, गणेश लोहकरे, दीपक देवतळेे, अमोल पाटील आदी उपस्थित होते. संतोष ओंकार, शुभम नगराळे यांनी सहकार्य केले. संचालन जितेंद्र मुनेश्वर यांनी, तर आभार उमेश घरडे यांनी मानले.

Web Title: Greetings program at Ghatanji