शहरं
Join us  
Trending Stories
1
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
2
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
3
'जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही'- देवेंद्र फडणवीस
4
KDMC Election 2026: 'निवडणुकीतून माघार घ्या', ठाकरेंच्याच जिल्हाप्रमुखांनी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले?
5
"फटाके फोडणारे देशद्रोही आहेत, भारतात फटाक्यांवर बंदी घाला"; भाजपा नेत्या मनेका गांधी भडकल्या
6
व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यादरम्यान आमचे ३२ नागरिक मारले गेले, या देशाचा अमेरिकेवर आरोप
7
सावधान! तोतया पोलीस अधिकारी आणि कुरिअरचा सापळा; ८१ वर्षीय व्यावसायिकाला ७ कोटींचा चुना
8
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
9
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
10
"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण
11
"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज!
12
"...म्हणून नारायण राणे निवृत्त होत असतील"; सुनील तटकरेंचे सूचक विधान, काय म्हणाले?
13
"राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा",  काँग्रेसची मागणी
14
Malegaon Municipal Election 2026 : लोकसभेत ऐनवेळी मागे पडलो; आता एकत्रित लढायचे - गिरीश महाजन
15
ST निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास...; मंत्री प्रताप सरनाईक यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
16
Shocking: "आई-बाबा मला माफ करा, मी चांगली मुलगी होऊ शकली नाही", चिठ्ठी लिहून मुलीचा आयुष्याचा शेवट!
17
एकाच फंडातून शेअर्स, कर्ज आणि सोने-चांदीत गुंतवणूक; मल्टी अॅसेट फंडांचा २०२५ मध्ये १६% नफा
18
बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण
19
Ravindra Chavan : "गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका", रवींद्र चव्हाण यांचं आवाहन
20
‘भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षण संस्थेला एक कोटीचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:05 IST

गोसेवेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत येथील तलाव फैलातील गोरक्षण संस्थेला एक कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. गोवर्धन, गोवंश, गोसंवर्धन योजनेतून हा निधी या संस्थेला प्राप्त होणार आहे.

ठळक मुद्देगोसेवकांचा सत्कार : यवतमाळ गोरक्षणात वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गोसेवेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत येथील तलाव फैलातील गोरक्षण संस्थेला एक कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. गोवर्धन, गोवंश, गोसंवर्धन योजनेतून हा निधी या संस्थेला प्राप्त होणार आहे. या निधीतून गोसंवर्धानासाठी आवश्यक असलेल्या बाबी पूर्णत्वास नेल्या जाईल, अशी माहिती शनिवारी आयोजित आमसभेत देण्यात आली. यावेळी संस्थेतर्फे गोसेवकांचा सत्कार करण्यात आला. परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनेसाठी जिल्ह्यातून १४ प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाकडे सादर झाले होते. यामध्ये गोरक्षण संस्थानचे उपक्रम, अंकेक्षण आणि गोपालनाच्या बाबींचा समावेश होता. या सर्व बाबीमध्ये येथील तलाव फैलातील गोरक्षण संस्थान अव्वल ठरले. यामुळे ही संस्था एक कोटींच्या अनुदानाची मानकरी ठरली आहे. चार टप्प्यात संस्थेला अनुदान मिळणार आहे. यातून गाईसाठी शेड, साठवणूक गोदाम आणि गाईचे शेण आणि गोमूत्रापासून विशिष्ट प्रकारचे उत्पादन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगितले.यावेळी उत्कृष्ट गोसेवेसाठी शंकरलाल नौबतराम सिंघानिया आणि सिंधी समाज महिला मंडळाला पुरस्कार जाहीर झाला. सिंधी समाज मंडळातर्फे रेखा बागाई, कृष्णा बखत्यार यांना गोसेवा मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गोरक्षणच्यावतीने दरवर्षी असा प्रकारचा पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. याठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. आमसभेत सादर करण्यात आलेल्या जमा खर्चास एकमताने मंजुरी देण्यात आली.या सभेत येणाºया श्रावणाच्या निमित्ताने एक गाय दोन महिन्यासाठी दत्तक योजना जाहीर करण्यात आली. या योजनेत जो कोणी दोन महिन्यासाठी गाय दत्तक घेईल त्याला पाच हजार १०० रुपये देणगी ठेवण्यात आली आहे. यामध्ये गाईचा चारा, पाणी, पूर्ण संगोपण याचा समावेश आहे. या योजनेसाठी संबंधितांनी गोरक्षण कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन गोरक्षणच्यावतीने करण्यात आले आहे. या योजनेच्या सुरुवातीलाचा दोन महिन्यासाठी लव किशोर दर्डा व सोनाली लव दर्डा यांनी गाय दत्तक घेऊन योजनेचा शुभारंभ केला आहे.यावेळी गोरक्षण संस्थानचे अध्यक्ष अनिल अटल, सचिव किसनलाल सिंघानिया, सहसचिव घनश्याम बागडी, कोषाध्यक्ष केतन मजेठिया, किशोर दर्डा, डॉ.सुरेंद्र पद्मावार, रामजीलाल शर्मा, ब्रिजमोहन भरतिया, हरबक्षराय वाधवाणी, जयंत सूचक, भरत शहा, राजेंद्र निमोदिया, प्रदीप ओमनवार, नंदलाल बागडी, चंद्रशेखर मोर, जुगलकिशोर लढ्ढा, सत्यनारायण मुंधडा, नंदलाल मुंधडा, राधाकिसन धुत, पं.शिवनारायण शर्मा, सतीश फाटक, श्रीकिसन झंवर, कैलास लष्करी, गणेश सिंघानिया, रोहित पाटील, नाना इंगळे, बाबूलाल बागडी, कमलकिशोर भट्टड, राजेश लोहाणा आदी उपस्थित होते.