शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

ग्रामसेवकाने केला दोन कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 21:23 IST

दिग्रस तालुक्यातील बोरकर नामक ग्रामसेवकाने १४ व्या वित्त आयोग निधीत चक्क एक कोटी ७९ लाखांचा अपहार केल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत केला.

ठळक मुद्दे‘चौकीदार ही चोर’ : जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सदस्याकडून भंडाफोड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिग्रस तालुक्यातील बोरकर नामक ग्रामसेवकाने १४ व्या वित्त आयोग निधीत चक्क एक कोटी ७९ लाखांचा अपहार केल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत केला. ग्रामपंचायतीचा ‘चौकीदारच चोर’ निघाल्याचा आरोप करून सदस्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली.जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्वसाधारण सभा सुरू झाली. या सभेत शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड यांनी जिल्हा परिषदेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे भोंगळ कारभार सुरू असल्याचा प्रहार केला. वेडद ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार प्रकरणावर दोन वर्षांपासून कारवाई होत नसल्याबद्दल मोहोड, गजानन बेजंकीवार यांनी संताप व्यक्त केला. यानंतर स्वाती येंडे यांनी प्रोसिडींग चुकीचे लिहिल्याचा आरोप केला. अधिकारी सभागृहात चुकीची माहिती देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सुमित्रा कंठाळे, राम देवसरकर, जया पोटे, रुक्मिणी उकंडे, हितेश राठोड आदी सदस्यांनी सभेत प्रशासनाला धारेवर धरले.लखनसिंग राठोड यांनी दिग्रस तालुक्यातील साखरा, धानोरा, वाई लिंगी, लिंगी वाई ग्रामपंचायतीच्या सचिवाने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत तब्बल एक कोटी ७९ लाख सात हजार ३३० रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केला. संबंधित ग्रामसेवकाची संपत्ती जप्त करून सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. ग्रामसेवकाने कुणाच्या भरवशावर हा भ्रष्टाचार केला, असा आरोपही त्यांनी उपस्थित केला. गावाचा चौकीदारच चोर असल्याचे त्यांनी सांगितले. पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडदे यांनी सदस्य ग्रामसेवकावर कारवाई प्रस्तावित असल्याचे सांगितले. अध्यक्षांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अंकेक्षण करण्याचे आदेश दिले. चित्तरंजन कोल्हे, उषा काकडे यांनी राळेगाव तालुक्यातील वरध, झाडगाव, वाढोणाबाजार येथील आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगली. अधिकारी पाहतो, चौकशी करतो, अशी उत्तरे देवून वेळ मारून नेत असल्याचा आरोप त्यांनी केला.कुटुंबनियोजनात जिल्हा माघारलायावर्षी जिल्ह्याला १७ हजार २०० कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट होते. केवळ १६ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सभेत सांगितले गेले. राम देवसरकर यांनी समाजकल्याणमधील अनागोंदी चव्हाट्यावर आणली. मंगला पावडे यांनी महात्मा फुले जनआरोग्य सुविधेत विषबाधा प्रकरणाचा समावेश करण्याचा ठराव मांडला. अनिल देरकर यांनी पीएचसीच्या उद्घाटनाला बोलावले नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. गुंज पीएचसीचे सहा वर्षानंतरही बांधकाम रखडल्याबद्दल महागाव सभापतींनी संताप व्यक्त केला. वणीच्या सभापती लिशा विधाते यांनी संचमान्यता चुकीची असल्याचा आरोप केला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत