शासकीय मैदानातील दांडिया रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:21 PM2018-09-14T22:21:44+5:302018-09-14T22:22:23+5:30

गेल्या दोन दिवसांपासून शासकीय मैदानावर आयोजित दांडियाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादावर जेसीआयने मोठ्या मनाने माघार घेतल्याने शुक्रवारी पडदा पडला. जेसीआयतर्फे हा दांडिया आता अन्य ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.

Government cancels canceled | शासकीय मैदानातील दांडिया रद्द

शासकीय मैदानातील दांडिया रद्द

Next
ठळक मुद्देखेळाडूंमध्ये समाधान : जेसीआयने घेतली मोठ्या मनाने माघार

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या दोन दिवसांपासून शासकीय मैदानावर आयोजित दांडियाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादावर जेसीआयने मोठ्या मनाने माघार घेतल्याने शुक्रवारी पडदा पडला. जेसीआयतर्फे हा दांडिया आता अन्य ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. जेसीआयच्या या निर्णयामुळे या मैदानावर सराव करणाऱ्या युवा खेळाडूंमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त जेसीआयतर्फे गेल्या पाच वर्षांपासून वणी शहरात दांडियाचे आयोजन केले जाते. महिला व मुलांच्या सुरक्षितता व सोयीच्या दृष्टीने यावर्षी जेसीआयने शासकीय मैदानावर दांडिया आयोजित करण्याचे ठरविले. त्यानुसार सदर शासकीय मैदानावर दांडिया आयोजनासाठी परवानगी देण्याच्या मागणीचा अर्ज जेसीआयतर्फे तालुका क्रीडा अधिकाºयांकडे करण्यात आला होता. या अर्जावर आमदार बोदकुरवार यांनी सदर मैदान दांडियासाठी देण्याबाबत शिफारस केली होती. त्मात्र ही बाब या मैदानावर नियमीत सराव करणाºया खेळाडूंना कळल्यानंतर या खेळाडूंनी एकत्रितपणे शासकीय या दांडियाला विरोध केला. गुरूवारी शेकडो खेळाडूंनी आमदार बोदकुरवार यांच्या निवासस्थानी जाऊन आपली व्यथा मांडली होती. त्यावर खेळाडूंच्या भावना लक्षात घेऊन आमदार बोदकुरवार यांनी जेसीआयच्या पदाधिकाºयांना शासकीय मैदानाऐवजी अन्य ठिकाणी दांडियाचे आयोजन करण्याबाबत सुचविले होते. पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण स्वत:ही प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार बोदकुरवार यांनी दिले होते.
पोलीस भरती, सैनिक भरतीसाठी तयारी करणारे शेकडो युवक दररोज शासकीय मैदानावर सराव करतात. मात्र दांडियाच्या आयोजनामुळे नऊ दिवस हे मैदान उपलब्ध राहणार नसल्याने खेळाडू अस्वस्थ झाले होते. जेसीआयच्या पदाधिकाºयांनी खेळाडुंची भूमिका समजून घेतली. त्यांच्या नियमित सरावाचा खोळंबा होऊ नये, यासाठी जेसीआयच्या पदाधिकाºयांनी एकत्र येऊन बैैठक घेतली. या बैठकीत सर्वानुमते अन्य ठिकाणी दांडियाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जेसीआय ही सामाजिक संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. या संघटनेकडून कुणालाही त्रास होऊ नये, ही आमची नेहमीच भूमिका राहीली आहे. शासकीय मैदानाच्या विषयातही आम्ही तिच भूमिका ठेवली, असे जेसीआयचे संस्थापक अध्यक्ष सुमित चोरडिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान
१३ सप्टेंबरला सर्वत्र गणरायाची स्थापना झाली. त्यासाठी शासकीय मैदानावर मोठ्या संख्येने मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने लावली होती. शुक्रवारी या मैदानावर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली होती. मैदानावर नियमित सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन मैदानावर स्वच्छता अभिया राबविले. संपूर्ण मैदान स्वच्छ करून गोळा झालेला कचरा एका ठिकाणी एकत्र ठेऊन त्याचे दहन करण्यात आले.

Web Title: Government cancels canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.