गोवंश मांसाची तस्करी करणारे रॅकेट जाळ्यात

By Admin | Updated: February 23, 2016 02:56 IST2016-02-23T02:56:07+5:302016-02-23T02:56:07+5:30

येथून मोठ्या प्रमाणात गोवंश मासाची हैदराबाद येथे तस्करी केली जात होती. या रॅकेटची गोपनीय माहिती मिळाल्यावरून

Govansh meat smuggling rackets | गोवंश मांसाची तस्करी करणारे रॅकेट जाळ्यात

गोवंश मांसाची तस्करी करणारे रॅकेट जाळ्यात

यवतमाळ : येथून मोठ्या प्रमाणात गोवंश मासाची हैदराबाद येथे तस्करी केली जात होती. या रॅकेटची गोपनीय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने रविवारी रात्री स्थानिक मालाणी बाग येथून सात आरोपींना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून दीडटन गोवंश जप्त केले.
यवतमाळ शहरातून हैदराबाद येथे अनेक दिवसांपासून गोवंश मास पाठविण्यात येते होते. याची गोपनीय माहिती शोध पथकातील संजय दुबे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी पाळत ठेवत या रॅकेटच्या हालचाली टिपल्या. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांच्या मार्गदर्शनात सापळा रचून मालाणी बाग येथून आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये बर्फ टाकून गोवंश मास साठविले होते. बोलेरो पिकअप (एमएच ३०- एबी ३४९९ ) या वाहनातून हैदराबादकडे नेण्यात येत होते. पोलीस पथकाने धाड टाकून आरोपी हमजाबीन हसन चाऊस (४९) रा. इस्मालपुरा या वाहन चालकासह कुरेशीपुरा येथील आसिफ अब्दूल कादर कुरेशी (३५), अब्दूल समीर अब्दूल आसिफ कुरेशी (१९), मो. साजीद मो. शमीम कुरेशी (२२), जीगर अली वहाब अली (१९) रा. अशोक नगर, रज्जाक गुलाब कुरेशी (३०) रा. अशोकनगर आणि विधी संघर्षग्रस्त बालकाला अटक केली.
घटनास्थळावरून १ हजार ३७५ किलो गोवंश मास जप्त केले. याशिवाय प्लास्टिकचे ११ ड्रम, चार मोबाईल, दोन दुचाकी, बोलेरोे पिकअप, असा ७ लाख ३७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंश मांस जप्तीची जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात जमादार ऋषी ठाकूर, प्रदीप नाईकवाडे, किरण पडघण, गजानन अजमिरे, आशिष भुसारी, प्रफुल्ल दळवी, ममता देवतळे यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)

पोलिसांना रॅकेटचा शोध
४आरोपींनी गोवंश मास कोठून गोळा केले, या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, मांसविक्री नेमकी कुठे केली जाते याचा शोध पोलीस घेत आहेत. जप्त केलेल्या मासाचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नागापुरे यांच्या पथकाने नमुने घेतले असून ते तपासणीसाठी सांताकू्रझ येथील प्रयोगशाळेत पाठविले.

Web Title: Govansh meat smuggling rackets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.