शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
2
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
3
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

पुसदमध्ये गोरसेनेचा महाआक्रोश, मृतकाच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 18:13 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाला झुगारुन शुक्रवारी गोर सेनेच्यावतीने पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देशहराला पोलीस छावणीचे स्वरूपएसडीओ कार्यालयावर धडकला मोर्चा

यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी (दौ.) येथील श्याम राठोड या युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी गोर सेनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी बंजारा समाजबांधवांचा महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविले. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाला झुगारुन हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी पोलिसांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळी (दौ.) येथे ३ डिसेंबर रोजी दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून काही युवकांनी श्याम शेषराव राठोड याचा खून केला होता. यानंतर काळी येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी तेथे ठिय्या मांडून विविध उपाययोजना केल्या. त्यानंतरही शुक्रवारी गोर सेनेच्यावतीने पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

पुसद, काळी दौ.सह लगतच्या तालुक्यातील समाजबांधवांनी मोर्चात सहभाग घेतला. अनेक समाजबांधव वाहने आणि पायदळ येथील वसंत उद्यान परिसरात पोहोचले. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, डॉ. आंबेडकर चौक, मुखरे चौक, यशवंत रंगमंदिर मैदानमार्गे मोर्चा दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. तेथे त्यांना अभिवादन करण्यात आले. नंतर गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, प्रवक्ते प्रफुल्ल जाधव यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या मोर्चातील गर्दी बघून उपविभागीय अधिकारी सावन कुमार यांनी वसंतराव नाईक चौकात येऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी एका महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला. दुपारी १.४०च्या सुमारास मोर्चा विसर्जित झाला.

आमदारांना पाठवले आल्या पावली परत

दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यावेळी आमदार इंद्रनील नाईक मोर्चात सहभागी होऊन सभास्थळी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. मात्र, मोर्चेकऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत त्यांना आल्या पावली परत पाठवले.

टॅग्स :agitationआंदोलनSocialसामाजिक