दिग्रस ठाण्यावर धडकले गोर सेनेचे कार्यकर्ते
By Admin | Updated: March 11, 2016 02:48 IST2016-03-11T02:48:13+5:302016-03-11T02:48:13+5:30
आशुतोष राठोड याच्या निघृण हत्येप्रकरणी पोलीस तपासात निष्काळजीपणा करीत असल्याचा आरोप करून यातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी,

दिग्रस ठाण्यावर धडकले गोर सेनेचे कार्यकर्ते
आंदोलनाचा इशारा : आशुतोषच्या मारेकऱ्यांना अटक करा
दिग्रस : आशुतोष राठोड याच्या निघृण हत्येप्रकरणी पोलीस तपासात निष्काळजीपणा करीत असल्याचा आरोप करून यातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीसाठी गोर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते पोलीस ठाण्यावर धडकले. अन्यथा १९ मार्च रोज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
मृतक आशुतोष देवराव राठोड याची २ जानेवारी २०१६ रोजी काही समाजकंटकांनी निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, याबाबत योग्य न्याय न मिळाल्यामुळे ९ जानेवारी २०१६ ला गोर सेनेकडून दारव्हा येथे रास्ता रोको आंदोलन करून निषेध करण्यात आला व सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी दारव्हा यांच्याकडे तपास देण्यात आला. परंतु तपासाचे परिणाम पूर्वीसारखेच दिसत असल्याचा आरोप करीत गोर सेनेने गुरुवारी दिग्रस पोलीस ठाण्यावर धडक दिली.
पोलीस प्रशासन डोळे झाक करीत असून मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सीआयडी कडे द्यावे आणि पीडितांना न्याय देऊन अन्याय थांबविण्यासाठी गोर सेने कडून मृतक आशुतोष देवराव राठोड यांच्या कुटुंबियासोबत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन १९ मार्च रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत दिग्रस तहसील समोर करणार असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद आहे.
योग्य न्याय न मिळाल्यास गोर सेना कडून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामांना पोलीस प्रशासन व शासन जबाबदार राहील असे निवेदन दिग्रस पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांना गोर सेनेकडून देण्यात आले.
निवेदन देतीवेळी गोर सेनेचे चंदन पवार, सुभाष चव्हाण, पवन आडे, रविकुमार राठोड, लखन चव्हाण, निलेश राठोड, योगेश राठोड, दिलू चव्हाण, राम जाधव आदींसह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)