शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बहिणींना आणणार सोन्याचे दिवस; एकनाथ शिंदे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:38 IST

Yavatmal : योजना कायमस्वरूपी चालत राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लाडकी बहीण योजना हे आपले कवच आहे. त्यामुळे ही योजना यापुढे कायमस्वरूपी चालत राहील, अशी ग्वाही देत पंतप्रधान मोदी यांनी लखपती दीदीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे आपणही लाडक्या बहिणींना लखपती बनवून त्यांना सोन्याचे दिवस दाखविणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

येथील समता मैदानावर आयोजित आभार सभेत ते बोलत होते. मंचावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. विरोधकांनी आम्हाला कस्पटासमान समजून हलक्यात घेतले. मात्र, याच लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी यांच्या जिवावर आम्ही राज्यात सर्वसामान्यांचे सरकार आणले. निवडणुका संपल्या म्हणून या घटकांना आम्ही विसरणार नाही. अडीच कोटी बहिणींचा लाडका भाऊ हे माझ्यासाठी सर्वांत मोठे पद असल्याचे सांगत या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी राज्यात राबविलेल्या विविध योजनांचा पाढा वाचला. एक रुपयात पीक विमा, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १६ हजार कोटींची मदत, पोहरादेवी देवस्थानसाठी सव्वा सातशे कोटी तसेच सिंचनासाठी कोट्यवधींचा निधी दिला असून पाच कोटी लोकांना विविध योजनांच्या माध्यमातून थेट मदत दिल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य माणूस हा या सरकारचा केंद्रबिंदू आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो, अडीच वर्षे मी मुख्यमंत्री असताना सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून राहिलो, हे नाते या पुढेही कायम राहील, असे सांगत उपस्थितांचे त्यांनी आभार मानले. शिवसैनिकांनाही त्यांनी गाफिल न राहण्याची सूचना केली. विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळविले आहे. यशाची ही परंपरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांतही कायम राहिली पाहिजे, विकास कामांच्या जोरावर आपण ते करून दाखवू, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेYavatmalयवतमाळladki bahin yojanaलाडकी बहीण योजना