सराफा व्यापाऱ्याने लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:01 IST2017-12-08T22:01:39+5:302017-12-08T22:01:57+5:30

शहरातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक संजय रमेश कैपिल्यवार यांनी शुुक्रवारी दुपारी घरातच गळफास लावून आत्महत्या केली.

Gold trader blasted | सराफा व्यापाऱ्याने लावला गळफास

सराफा व्यापाऱ्याने लावला गळफास

ठळक मुद्देआत्महत्येमागील कारणांचा शोध

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : शहरातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक संजय रमेश कैपिल्यवार यांनी शुुक्रवारी दुपारी घरातच गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने सराफा व्यापाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
सराफा व्यवसायी, बिल्डर व कंत्राटदार, असा संजय कैपिल्यवार यांचा व्यावसायिक प्रवास आहे. कधीकाळी शहरातील क्रमांक एकचे सराफा व्यापारी म्हणून त्यांचा लौकिक होता. गेल्या काही वर्षापासून ते कंत्राटदार म्हणून काम करीत होते. त्यांनी आपल्या जीवनात अनेक चढउतार अनुभवले. त्यामुळे कुठल्याही परिस्थतीला तोंड देणारा दिलदार मित्र म्हणून त्यांची शहरात ओळख होती.
त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे सर्वांनाच कोडे पडले आहे. धामणगाव मार्गावरील राहत्या घरात पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये त्यांनी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गळफास लावून घेतला. हा प्रकार पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी शेजाºयांच्या मदतीने त्यांना रूग्णालयात हलविले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कैपिल्यवार यांच्या मागे पत्नी, दोन मुली व मोठा आप्त परिवार आहे. याप्रकरणी वृत्तलिहेपर्यंत पोलिसांनी कोणतीच नोंद घेतली नव्हती.
संजय कैपिल्यवार यांच्या आत्महत्येने सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Gold trader blasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.