शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

बँक लॉकरमधून काढलेले सहा लाखांचे सोने उडविले ; यवतमाळमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 14:13 IST

एका चोरट्याने सहा लाख रुपये किंमतीचे ४७ तोळे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस शहरात बुधवारी सायंकाळी ६ वाजता भरचौकात घडली.

ठळक मुद्देचोरटा सीसीटीव्हीत कैद दागिने कुठेच सुरक्षित राहिले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोन्याचे दागिने अंगावर घातले तरी चोराची भीती, घरात ठेवले तरी चोराची भीती. म्हणून लोक आता बँकांच्या लॉकरमध्ये दागिने ठेवतात. परंतु चोरटे आता लॉकरमधून दागिने काढणाऱ्यांवरही पाळत ठेऊ लागले आहे. अशाच पाळतीतून एका चोरट्याने सहा लाख रुपये किंमतीचे ४७ तोळे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले.ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस शहरात बुधवारी सायंकाळी ६ वाजता भरचौकात घडली. प्रभाकर मोहनराव देशमुख (६१) रा. सिंगद ता. दिग्रस असे यातील फिर्यादीचे नाव आहे. शेतकरी असलेल्या देशमुख यांच्याकडे विवाह समारंभ असल्याने त्यांनी आपले यवतमाळ अर्बन बँकेच्या दिग्रस शाखेतील लॉकरमध्ये असलेले ४७ तोळे सोन्याचे दागिने बुधवारी काढले. हे दागिने त्यांनी बॅगमध्ये ठेऊन ती बॅग आपल्या मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवली. दरम्यान दिग्रसमधील एका सलून व्यावसायिकाकडे ते लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेले. पत्रिका देऊन पाचच मिनिटात परत आले असता रस्त्यावर उभ्या ठेवलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीतील सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्याने क्षणार्धात उडविली. या दागिन्यांची किंमत पाच लाख ७४ हजार रुपये एवढी सांगितली जाते. त्यांनी घटनेची माहिती दिग्रस पोलिसांना दिली. पोलिसांच्या तपासात चोरटा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हा चोरटा दिग्रसमधील असावा किंवा एखादवेळी लग्न सोहळ्याबाबत माहिती असल्याने सिंगदमधील असण्याची शक्यताही दारव्हाचे उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी लोकमतकडे बोलून दाखविली.बँक ग्राहकांवर चोरट्यांची नजरग्राहक बँकेत पैसे टाकायला, काढायला जातो, कुणी ग्राहक दागिने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी किंवा काढण्यासाठी जातो. अशा ग्राहकांवर चोरट्यांची कायम नजर असते. अनेक बँकांच्या समोर हे चोरटे वेगवेगळ्या निमित्ताने उभे असतात. कधी ते विक्रेते म्हणूनही दिसतात. ग्राहकाच्या हालचालीवरून त्यांच्याकडे कॅश, दागिने हा ऐवज आहे का याचा अंदाज चोरटे बांधतात. खात्री पटताच त्या ग्राहकाचा पाठलाग केला जातो.दागिन्यांचा प्रवास असुरक्षितबँकेतून निघालेल्या ग्राहकाच्या हाती बॅग असेल तर त्याच्या अंगावर तोंडात बिस्कीट खावून थुंकणे, उलटी करणे, तुमच्या अंगावर घाण पडली असे खोटे सांगणे अशी शक्कल लढविली जाते. ग्राहक ते धुण्यासाठी नळावर जाताच चोरटे त्याची बॅग घेऊन पोबारा करतात. बहुतांश बसस्थानकावर असे प्रकार घडतात. दिग्रसमधील या घटनेने आता दागिने लॉकरमध्ये सुरक्षित असले तरी या दागिन्यांचा बँक ते घर किंवा घर ते बँक हा प्रवास सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी