लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील वंजारी फैलात विभक्त राहणाऱ्या महिलेच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन भोंदू मांत्रिकाने महिलेला व तिच्या अल्पवयीन मुलीला डांबून वर्षभर अघोरी उपचार केले. या प्रकरणाचा सोमवारी सायंकाळी भंडाफोड झाला. पोलिसांनी मायलेकीची सुटका केली. यानंतर मांत्रिकाच्या घरी रात्री उशिरापर्यंत सर्च सुरू होता. अघोरी पूजेच्या साहित्यासह रोख रक्कम व सोन्याचे दागिने असे घबाड पोलिसांच्या हाती लागले. अजूनही मांत्रिकाच्या घरात असलेल्या खड्ड्याचे व पूजा मांडलेल्या जागेचे उत्खनन करणे बाकी आहे.
महादेव परसराम पालवे उर्फ माऊली हा भोंदूबाबा मायलेकीवर अघोरी उपचार करीत होता. शहर ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या पुढाकारात कारवाई करीत पोलिसांनी मांत्रिकाच्या घरातून सोमवारी रात्री ९ लाख १० हजार रुपये रोख, सात लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच अष्टधातू व इतर मौल्यवान धातूच्या बनलेल्या मूर्ती, पूजा साहित्य यांची किंमत जवळपास ४५ हजार रुपये असा एकूण १६ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी दोन पंचांसमक्ष जप्त केला.
दरम्यान, पीडित महिला व तिची मुलगी यांच्या नातेवाईकांची माहिती घेऊन त्यांच्यासोबत संपर्क साधण्यात आला. मंगळवारी सकाळी पीडित महिलेचे वडील व भाऊ यवतमाळात पोहोचले. बहीण व भाचीची अवस्था पाहून त्यांना रडू कोसळले.
दोन्ही मायलेकीला पोलिसांनी तिच्या भावाच्या स्वाधीन केले. पुढील तपासासाठी भोंदू महादेव पालवे याला अटक करणे बाकी आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी प्रकृतीत सुधारणा झाल्याचे प्रमाणपत्र देताच भोंदूला अटक केली जाईल, असे ठाणेदार रामकृष्ण जयस्वाल यांनी सांगितले.
भाचीच्या शिक्षणासाठी दिले दोन लाखविभक्त राहणारी बहीण व तिच्या मुलीला आर्थिक मदत नियमित केली जात होती. भाचीच्या शाळा प्रवेशासाठी दोन लाख रुपये रोख काही दिवसांपूर्वीच पाठविल्याचे पीडितेच्या भावाने पोलिसांना सांगितले. पीडित महिला भोंदूच्या प्रभावात आल्याने घरच्यांसोबत सतत खोटी बोलत होती. दारव्हा येथे भाड्याच्या घरात राहते, असे सांगून दर महिन्याला २० हजार रुपये भाड्याची रक्कमही वडिलांकडून घेत होती. फोनवर संपर्कात राहून सर्व आलबेल असल्याचे दाखवत होती. त्यामुळे घरच्यांनी प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला नाही. यातूनच तिच्या व मुलीच्या छळाची मालिका सुरू राहिली.
भोंदू बाबा महादेव पालवे याला जवळपास १५ वर्षे वयाची मुलगी आहे. त्याने तिलाही शाळेत पाठविले नाही. तिचे पहिलीपर्यंतच शिक्षण झाले आहे. ही माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. तर भोंदू श्रावणी बहुउद्देशीय संस्थेंतर्गत शववाहिनी चालवित होता. त्याचा भाऊ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा विदर्भअध्यक्ष असल्याचेही पोलिस तपासून पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे. शरीरावर