कळंबमध्ये महिलेच्या प्रामाणिकपणाचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:23 IST2017-09-03T23:22:52+5:302017-09-03T23:23:31+5:30
सापडलेले सोन्याचे दागिने परत करणाºया महिलेचा चिंतामणी मंदिर प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला.

कळंबमध्ये महिलेच्या प्रामाणिकपणाचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : सापडलेले सोन्याचे दागिने परत करणाºया महिलेचा चिंतामणी मंदिर प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला.
येथील ज्योती बोबडे या महिलेला ५० हजार रुपये किंमतीचे दागिने चिंतामणी मंदिरात सापडले. तिने हे दागिने सापडलेले सोन्याचे दागिने परत करून प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दाखवून दिले. चिंतामणी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे यांच्याकडे सुपूर्द केले. देवस्थानने ज्या महिलेचे हे दागिने होते, त्या सुनीता पारधी या महिलेला ते परत केले. ज्योती बोबडे या महिलेच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून देवस्थान प्रशासनाच्यावतीने ज्योती बोबडेचा सत्कार कण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे यांनी तिला पाचशे रुपये बक्षीस दिले.