सौरऊर्जेवर सिंचन करणाऱ्या पुष्पा तिडके यांचा गुणगौरव

By Admin | Updated: April 6, 2016 02:33 IST2016-04-06T02:33:19+5:302016-04-06T02:33:19+5:30

संगणकीकृत आणि सौरऊर्जेवर ठिबक सिंचन ओलिताचा यशस्वी प्रयोग केल्याबद्दल लासीनाच्या माजी सरपंच पुष्पा तिडके ....

The glory of Pushpa Tidke, which is irrigating solar energy | सौरऊर्जेवर सिंचन करणाऱ्या पुष्पा तिडके यांचा गुणगौरव

सौरऊर्जेवर सिंचन करणाऱ्या पुष्पा तिडके यांचा गुणगौरव

सोनखास : संगणकीकृत आणि सौरऊर्जेवर ठिबक सिंचन ओलिताचा यशस्वी प्रयोग केल्याबद्दल लासीनाच्या माजी सरपंच पुष्पा तिडके यांचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे शुक्रवारी गौरव करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने घेण्यात आलेल्या सोहळ्यात विविध
क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विदर्भातील १२ महिलांना गौरविण्यात आले.
पुष्पा तिडके यांनी डाळींब पिकाचे सौरऊर्जेवर ओलित केले आहे. उच्च तंत्रज्ञानाचा शेतीत वापर केल्याबद्दल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू दाणी, ज्येष्ठ समाजसेविका राणी बंग यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, मानचिन्ह, शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या गौरवाबद्दल पुष्पा तिडके यांचे येथे कौतुक होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The glory of Pushpa Tidke, which is irrigating solar energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.