महागाव येथे कोविड योध्द्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:28 IST2021-06-17T04:28:24+5:302021-06-17T04:28:24+5:30

महागाव : येथे आरोग्य, पोलीस विभाग, सफाई कामगारांचा गौरव करण्यात आला. पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेने ...

Glory to the Kovid warriors at Mahagaon | महागाव येथे कोविड योध्द्यांचा गौरव

महागाव येथे कोविड योध्द्यांचा गौरव

महागाव : येथे आरोग्य, पोलीस विभाग, सफाई कामगारांचा गौरव करण्यात आला.

पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेने शिवसेना व युवासेनेच्यावतीने कोरोना योद्धा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्ष डाॅ. वैभव नखाते होते. प्रमुख पाहुणे म्हणून एपीआय बालाजी शेंगेपल्लू, तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य बी. एन. चव्हाण, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सुदाम खंदारे, उमरखेड तालुका संघटिका सुनीता देशमुख, महागाव तालुका संघटक रवींद्र भारती, दत्तराव चिंचोलकर, अमोल चिकने, अशोक तुमवार उपस्थित होते. युवासेनेचे जिल्हाप्रमुख विशाल पांडे यांनी प्रास्ताविक केले.

राम तम्बाखे, ऋषिकेश बलखंडी, सुमित गोविंदवाड, सॅम कदम, मारुती डोरले, प्रवीण कोकरे, ऋषिकेश वाघमारे, दिनेश ठाकरे, सोनू इंगोले, बंटी गिरी, नीलेश पानपट्टे, गजानन गाडे, रोहन देशमुख, गजानन शिंदे आदींचे सहकार्य लाभले. संचालन केतकी पांडे यांनी केले.

Web Title: Glory to the Kovid warriors at Mahagaon