शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

खात्री करूनच काम द्या; आता चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची प्रक्रिया झाली ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:29 IST

Yavatmal : नाहीतर येईल पश्चाताप करण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मोठ्या शहरातील सराईत गुन्हेगार गंभीर गुन्हे करून लहान शहरात मिळेल ते काम घेत ओळख लपवून राहतात. संधी मिळाल्यानंतर तेथे मोठा गुन्हा करून पलायन करतात. अनेक प्रकरणात आस्थापनेलाच मोठे नुकसान सोसावे लागते. आता तर शैक्षणिक क्षेत्रातही पुरुष शिक्षकांबाबत चारित्र्य पडताळणी सक्तीची केली आहे. यामुळे प्रत्येकाने नंतर पश्चाताप करण्याऐवजी आपल्याकडे असणाऱ्या कामगाराच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची खात्री करून घ्यावी.

चारित्र्य पडताळणी करताना संबंधित व्यक्तीबाबतची माहिती पोलिस ठाणे स्तरावरून मागविली जाते. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्या व्यक्तीचे वास्तव्य राहिले आहे, त्यांच्याकडून वर्तणुकीबाबतचा अहवाल घेण्यात येतो. त्यानंतरच चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते. यामुळे ओळख लपवून गुन्हे करणाऱ्यांवर जरब निर्माण झाली आहे. शिवाय आस्थापनांनाही चारित्र्यवान कामगार निवडण्याची संधी यातून मिळत आहे.

चारित्र्य पडताळणी कोणासाठी आवश्यक? शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, शैक्षणिक संस्था, रुग्णालय येथे काम करणाऱ्यांसाठी हे प्रमाणपत्र मागितले जाते.

परप्रांतातील गुन्हेगार येऊ शकतात कामावर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे त्या व्यक्तीचा पूर्वेतिहास उलगडणारा अधिकृत दस्तऐवज असतो. बऱ्याचदा इतर राज्यात, जिल्ह्यात गंभीर गुन्हा करून ओळख लपवत नव्या ठिकाणी कामावर रूजू होण्याचा गुन्हेगारांचा प्रयत्न असतो. या पडताळणीतून त्यांना असे करता येत नाही. त्यामुळे पुढचा धोकाही टळतो.

सीसीटीएनएस प्रणाली या प्रणालीमुळे देशभरातील गुन्हेगारांची नोंद एकत्र होत आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावे कोणते गुन्हे कुठे दाखल आहेत, हे सहज शोधता येते. ओळख लपवून गुन्हेगार राहू शकत नाही.

वर्षभरातील चारित्र्य पडताळणी अर्ज एकूण अर्ज - २०६४४ मंजूर अर्ज - २०१३२ नामंजूर - ७८ प्रलंबित - २५८ सेंट टू सिटीझन - १७२

टॅग्स :PoliceपोलिसYavatmalयवतमाळ