कंत्राटी नर्सेसला राखीव कोटा द्या

By Admin | Updated: April 30, 2016 02:43 IST2016-04-30T02:43:16+5:302016-04-30T02:43:16+5:30

कंत्राटी नर्सेसला पदभरतीमध्ये राखीव कोटा देण्यात यावा, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांनी केली.

Give quota reserved for contract nurses | कंत्राटी नर्सेसला राखीव कोटा द्या

कंत्राटी नर्सेसला राखीव कोटा द्या

अशोक जयसिंगपुरे : टिळक स्मारक मंदिरात कंत्राटी नर्सेसची सभा
यवतमाळ : कंत्राटी नर्सेसला पदभरतीमध्ये राखीव कोटा देण्यात यावा, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांनी केली.
राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना तसेच राज्य कंत्राटी नर्सेस संघटनेच्या संयुक्त विद्यमाने टिळक स्मारक मंदिरात कंत्राटी नर्सेसची सभा पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जयसिंगपुरे बोलत होते. कंत्राटी नर्सेस गेल्या नऊ वर्षांपासून एनआरएचएममध्ये सेवा देत आहे. परंतु त्यांना सरळ सेवा पदभरतीत प्राधान्य किंवा राखीव कोटा नाही. हिवताप विभागात ९० दिवस रोजंदारीवर काम करणाऱ्या फवारणी कर्मचाऱ्यांना पदभरतीत ५० टक्के कोटा राखीव आहे. तसेच आरोग्यसेवक महिला व आरोग्यसेवक पुरुष यांचे पदभरतीचे नियम वेगवेगळे आहेत. आरोग्यसेवकांना २००३ चे नियम लागू आहेत, तर आरोग्यसेविकांना १९६६-६७ चे सहाय्यक परिचारिका, प्रसविकाचे नियम लागू आहेत. तेव्हा आरोग्यसेविकांच्या पदभरती नियमात काळानुसार बदल होणे अपेक्षित आहे. आठ-नऊ वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर आरोग्यसेविका कंत्राटी पद्धतीने सेवा देत आहे. त्यांचा शासनाने विचार करून पदभरतीत राखीव कोटा देण्याची मागणी या सभेत करण्यात आली.
उपकेंद्रास प्रसूती नसल्यास कार्यमुक्ती या विभागाच्या प्रकारावर चर्चा करण्यात आली. वणी, झरी, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी येथील कंत्राटी आरोग्यसेविका, स्टाफ नर्स व एचएलव्ही यांचा नक्षलग्रस्त भत्ता २०१२-१३ पासून शासनाने बंद केला होता.
संघटनेच्या पाठपुराव्यानंतर तो लागू केला आणि २०१५-१६ ची थकबाकी दिली. परंतु उर्वरित थकबाकीबाबत पाठपुरावा सुरू आहे. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय समस्या सोडविण्याबाबत या सभेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
सभेचे आयोजक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अनंत सावळे यांनी प्रास्ताविक केले. नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष जयश्री पाठक, सचिव स्मिता अवझाडे, उपाध्यक्ष शीतल वऱ्हाडे, वर्षा वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला रामभाऊ भगत, दिलीप गोल्हर, शंकर महल्ले, संगीता किनाके, हेमलता वैद्य, गणेश खराटे, उमेश सरोदे, चंदा उईके, बिलबिले, नीता बरडे, सीमा वानखडे, ममता शेलारे यांच्यासह जिल्ह्यातील दोनशेवर कंत्राटी आरोग्यसेविका उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Give quota reserved for contract nurses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.