जोतिबा व सावित्रींना भारतरत्न द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:04 IST2018-08-28T22:02:14+5:302018-08-28T22:04:04+5:30
स्त्री शिक्षणाचे आद्य जनक महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीआई फुले या महामानवांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी तेजांकुर महिला मंचने केली आहे. या संदर्भात भारत सरकारला निवेदन पाठविण्यात आले आहे.

जोतिबा व सावित्रींना भारतरत्न द्या !
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्त्री शिक्षणाचे आद्य जनक महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीआई फुले या महामानवांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी तेजांकुर महिला मंचने केली आहे. या संदर्भात भारत सरकारला निवेदन पाठविण्यात आले आहे.
या महामानवांनी गतकाळात केलेल्या संघर्षाचे चीज व्हावे, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांचे कार्य समाजातील सर्व जनतेला कळावे, अशी मागणी तेजांकुरच्या अध्यक्ष अपुर्वा सोनार यांच्यासह मंचच्या सदस्यांनी भारत सरकारला निवेदन पाठविले आहे.
परतवाडा व करजगाव येथे मंचची सभा पार पडली. यावेळी उपस्थित महिलांनी ही मागणी लाऊन धरली. तसेच अपुर्वा सोनार यांचा ‘मी सावित्रीआई बोलते’ हा प्रयोग सादर झाला. यावेळी त्यांनी जोतिबा आणि सावित्री या महामानवांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.