तुरीचे चुकारे तत्काळ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:25 IST2018-03-17T22:25:07+5:302018-03-17T22:25:07+5:30
खुल्या बाजारात तुरीचे भाव घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आपली तूर हमीकेंद्राकडे नेली. या ठिकाणी तूर खरेदी झाल्यानंतर महिना लोटला तरी चुकारे मिळाले नाही.

तुरीचे चुकारे तत्काळ द्या
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : खुल्या बाजारात तुरीचे भाव घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आपली तूर हमीकेंद्राकडे नेली. या ठिकाणी तूर खरेदी झाल्यानंतर महिना लोटला तरी चुकारे मिळाले नाही. यामुळे बाजार समितीच्या सभापतींनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर केले. तत्काळ चुुकारे देण्याची मागणी केली. प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.
शेतकºयांची तूर खरेदी केल्यानंतर तीन दिवसात चुकारे देण्याच्या जाहिराती शासन स्तरावरून होत आहे. प्रत्यक्षात शेतकºयांच्या हातात छदामही मिळाला नाही. तूर खरेदीची मुदत १८ एप्रिलपर्यंत आहे. ती वाढविण्यात यावी. धिम्या गतीने तूर खरेदी सुरू ठेवल्यास ही तूर खरेदी होणे शक्य नाही, असा आरोप जिल्हा शेतकरी संघर्ष समितीने केला आहे.
खरेदी केलेला माल तत्काळ स्थानांतरित करण्यात यावा. खरेदी विक्री संघ आणि बाजार समितीची रक्कम तत्काळ अदा करण्यात यावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख, यवतमाळ बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, चंद्रशेखर बाबू पाटील वानखडे, आनंदराव जगताप, अरूण राऊत, सुरेश चिंचोळकर, सुरेश पात्रीकर, दिनेश गोगकर, सुहास दरणे, श्रीकांत आडे, अनिल गायकवाड, प्रा. घनश्याम दरणे, दत्तकुमार दरणे आदी उपस्थित होते.