प्रियकराने दिला दगा, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: November 26, 2014 17:16 IST2014-11-26T17:06:20+5:302014-11-26T17:16:28+5:30
अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे या गावात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

प्रियकराने दिला दगा, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. २६ - अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे या गावात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा प्रियकर पंकज गवई (वय २६ वर्ष) व त्याच्या तिघा मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून आणखी चौघा नराधमांचा शोध सुरु आहे.
अमरावतीजवळील रहाटगावात राहणारी १६ वर्षाच्या मुलीची शाळेत ये - जा करताना बोरगाव धर्माळे येथे राहणा-या पंकज गवईशी ओळख झाली व या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. काही दिवसांपूर्वी पंकजने शाळेत जाण्यासाठी निघालेल्या पिडीत मुलीला बळजबरी करत यवतमाळला नेले व तिथे मित्रांच्या साथीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर लागोपाठ दोन दिवस पंकज व त्याच्या मित्रांनी पिडीत मुलीला विविध ठिकाणी नेऊन तिच्या अत्याचार केले. बुधवारी पंकज व त्याचे मित्र पिडीत मुलीला घेऊन एसटी बसमधून गावी परतत होते. एसटी कर्मचा-याला या सर्वांवर संशय आला व त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी वडगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.