‘ती’ बालिका मृतावस्थेत आढळली

By Admin | Updated: June 14, 2017 00:13 IST2017-06-14T00:13:34+5:302017-06-14T00:13:34+5:30

तालुक्यातील दाभडी येथील नाल्याच्या पुरात बैलगाडीसह वाहून गेलेल्या बालिकेचा मंगळवारी मृतदेहच आढळला.

The girl found her dead | ‘ती’ बालिका मृतावस्थेत आढळली

‘ती’ बालिका मृतावस्थेत आढळली

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील दाभडी येथील नाल्याच्या पुरात बैलगाडीसह वाहून गेलेल्या बालिकेचा मंगळवारी मृतदेहच आढळला. नेहा प्रकाश राठोड (१२) रा. वानोळा (पानोळा) रा. माहूर असे मृत बालिकेचे नाव आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास दाभडी नाल्यातील पुरात बैलगाडीतील सहा जण सुखरुप बचावले होते. मात्र नेहा राठोड ही बालिका बेपत्ता झाली होती. मावशीकडे पाहुणी म्हणून नेहा आली होती. गावापासून एक किलोमीटर अंतरावरील नाल्यातून बैलबंडी जात असताना अचानक पुराचा लोंढा आल्याने बैलगाडी वाहून गेली होती. या बैलबंडीतील सहा जण बचावले होते. मात्र नेहा बेपत्ता होती. गावकऱ्यांनी रात्रभर तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळली नाही. मंगळवारी सकाळच्या सुमारास नाल्यामध्येच प्रदीप वानखेडे यांच्या शेताजवळील गाळात तिचा मृतदेह आढळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
 

Web Title: The girl found her dead