मुलगी अन् सुनेने दिला पार्थिवाला खांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:11 IST2019-07-04T21:12:57+5:302019-07-05T12:11:00+5:30

तालुक्यातील तरोडा या गावातील विठ्ठल रामचंद्र हरडे यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारात तिरडीला त्यांच्या मुलीने व सुनेने खांदा देऊन परंपरेला फाटा देत अग्नी संस्कारही केला.

Girl and listened to shoulder shoulder | मुलगी अन् सुनेने दिला पार्थिवाला खांदा

मुलगी अन् सुनेने दिला पार्थिवाला खांदा

वणी : तालुक्यातील तरोडा या गावातील विठ्ठल रामचंद्र हरडे यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारात तिरडीला त्यांच्या मुलीने व सुनेने खांदा देऊन परंपरेला फाटा देत अग्नी संस्कारही केला.

विठ्ठल रामचंद्र हरडे हे तरोडा गावातील एक धार्मिक व परिवर्तनवादी व्यक्ती म्हणून परिचित होते. त्यामुळेच त्यांच्या घरात पूर्वीपासूनच आधुनिक विचाराचे वातावरण होते. तसेच घरातील मोठे बंधू मोहन हरडे यांचा मराठा सेवा संघ या चळवळीशी संपर्क आला. यातूनच त्यांचे कुटुंब आधुनिक व परिवर्तनवादी विचाराने वागत आहे. मृत्यूनंतर रविवारी अंत्यसंस्काराकरिता तिरडीला खांदा देण्याची वेळ आली, तेव्हा मुलाप्रमाणे मुलीनेही आपल्या वडिलांना खांदा दिला. यात त्यांची मुलगी शारदा घोटेकर, लता वरपटकर, मंजुषा हरडे, सुरेखा हरडे, सिंधू काकडे, शांता बलकी, बेबी झाडे, कुंता गायकवाड यांचा समावेश होता.

Web Title: Girl and listened to shoulder shoulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.