घुई-बोरगाव रस्ता आठवड्यापासून बंद

By Admin | Updated: July 15, 2016 02:38 IST2016-07-15T02:38:39+5:302016-07-15T02:38:39+5:30

यवतमाळ ते नेर राज्य मार्गावर लासीना ते घुई-बोरगाव या रस्त्यावरील पुलाचे बाधंकाम अर्धवट अवस्थेत रखडले आहे.

Ghuuri-Borgaon road closes for a week | घुई-बोरगाव रस्ता आठवड्यापासून बंद

घुई-बोरगाव रस्ता आठवड्यापासून बंद

विद्यार्थी त्रस्त : पुलाचे काम अर्धवट, वळणरस्ता गेला वाहून
सोनखास : यवतमाळ ते नेर राज्य मार्गावर लासीना ते घुई-बोरगाव या रस्त्यावरील पुलाचे बाधंकाम अर्धवट अवस्थेत रखडले आहे. शिवाय वळण रस्ताही पूर्णपणे वाहून गेल्यामुळे गेल्या सात दिवसापासून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
या मार्गावरील एसटी बस किंवा खासगी वाहनेही आठवडाभरापासून बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठा फेरा मारून कामठवाडा-सारंगपूर मार्गे जावे लागत आहे. सात दिवसांपासून संततधार पावसामुळे पुलाचे काम ठप्प पडले आहे. वाहतुकीसाठी पुलाच्या बाजूने केलेला वळण रस्ताही पुरामुळे पूर्णत: वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरून वाहतुकीसाठी संधीच उरलेली नाही. यवतमाळ, लासीना येथे शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नाईलाजाने दहा किलोमीटर पायदळ जावे लागत आहे. यवतमाळ, घुई, बोरगाव, लाडखेड ही एसटी बसही सात दिवसांपासून बंद आहे. बोरगाव(लिंगा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे ये-जा करणाऱ्या रुग्णांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत वाहून गेलेला वळण रस्ता तरी नीट करावा, अशी मागणी घुई-बोरगाव येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Ghuuri-Borgaon road closes for a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.