दारूबंदीसाठी महागावात आमदारांना घातला घेराव

By Admin | Updated: June 2, 2015 00:16 IST2015-06-02T00:16:30+5:302015-06-02T00:16:30+5:30

तालुक्यासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानातर्फे ..

Gherao to the MLAs in the Mahagaya in the liquor market | दारूबंदीसाठी महागावात आमदारांना घातला घेराव

दारूबंदीसाठी महागावात आमदारांना घातला घेराव

लेखी आश्वासन : जिल्हा दारूबंदीच्या मागणीने घेतला वेग
महागाव : तालुक्यासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाने सोमवारी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या घराला घेराव घातला. येत्या अधिवेशनात या प्रश्नावर पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन घेऊनच स्वामिनींनी घेराव मागे घेतला. बराच वेळ आमदारांच्या घराला घेराव राहिल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली.
स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानातर्फे महागाव तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. येथील पंचायत समिती कार्यालयापासून हा मोर्चा निघाला. मोर्चाचे नेतृत्व स्वामिनी अभियानाचे संयोजक महेश पवार व तालुका संयोजक अमोल व्हडगिरे यांनी केले. दरम्यान, मोर्चातील स्वामिनींनी आक्रमक पवित्रा घेत थेट आमदार राजेंद्र नजरधने यांच्या घरालाच घेराव घातला. ठोस लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली. त्यामुळे बराच वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
अखेर आमदारांनी महिलांच्या आक्रमक भूमिकपुढे नमते घेत स्वामिनी दारूबंदी अभियानाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच येत्या अधिवेशनात या बाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मागणीच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तहसीलदारांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या अभियानाला मनसे महागाव शहर शाखेनेही पाठिंबा दिला. मोर्चामध्ये तालुक्यातील महिला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती.
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मनसे शहराध्यक्ष राजू राठोड, प्रमोद भरवाडे, सुरेश कड, संजू नरवाडे, मंगला देशमुख, लोपमुद्रा आखरे, जयश्री खंदारे, सुलोचना घोडे, उमेश गाडे, चंदा पाईकराव, प्रियंका गावंडे, संदीप खराटे, प्रवीणा लाव्हरे, बाळासाहेब शिंदे यांनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Gherao to the MLAs in the Mahagaya in the liquor market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.