घाटंजीत व्यसनमुक्त कार्यकर्त्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 22:10 IST2018-02-07T22:10:30+5:302018-02-07T22:10:43+5:30

घाटंजीत व्यसनमुक्त कार्यकर्त्यांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : येथील जलाराम मंदिरात मंगळवारी यवतमाळ जिल्हा विकास मंचतर्फे व्यसनमुक्ती चळवळीत कार्य करणाºयांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री शिवाजीराव मोघे होते. त्यांनी समाज व्यसनमुक्त करणे ही देशाची गरज असून व्यसनाधिनता समाजातून हद्दपार झाल्याशिवाय समाजाचा विकास अशक्य असल्याचे प्रतिपदान केले. प्रमुख पाहुणे माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांनी समाजातून व्यसन हद्दपार केल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले. यावेळी मंचावर व्यसनमुक्ती कार्यसम्राट संतोष शेळके, के.डी. जाधव, प्रकाश जानकार उपस्थित होते.
व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात विभागीय पुरस्काराने संतोष शेळके महाराज, महेश पवार यांचा गौरव करण्यात आला. दादासाहेब आगरकर, वेणूबाई झाडे, सुमित्रा सुरेश जाधव, वसीम गजली, महम्मद रुस्तम शेख, लता चौधरी, गोकुल राठोड, सुचिता नागोराव विभुने, चंद्रबोधी घायवटे, मनोहर बनस्कर, दयाराम चव्हाण, प्रल्हाद शिरल्लू, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, गोविंदराव नल्ममवर, पंकज पाल, महिला मंडळ कोरटा, रामकृष्ण महाराज, प्रदीप वाकपैजन यांचा शाल, श्रीफळ व पदक देऊन जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जितेंद्र मोघे, किशोर दावडा, डॉ.विजय कडू, मारोतराव पवार, गणेश मुद्दलवार, माणिक मेश्राम, सुभाष गोडे, सुरेश कुडगावे, मुजमिल पटेल, गणेश उन्नरकर, प्रमोद राठोड, अनिल बावणे, असलम कुरेशी आदींनी सहकार्य केले.