नागरिकांच्या तक्रारी त्वरित निकाली काढा
By Admin | Updated: December 4, 2014 23:17 IST2014-12-04T23:17:10+5:302014-12-04T23:17:10+5:30
लोकशाही दिनात प्राप्त होणाऱ्या तक्रारी त्वरित निकाली निघणे आवश्यक आहे. सदर दिवशी तक्रार येऊन येणाऱ्यांशी आत्मियतेने संवाद साधण्यासोबतच त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेतले पाहिजे.

नागरिकांच्या तक्रारी त्वरित निकाली काढा
यवतमाळ : लोकशाही दिनात प्राप्त होणाऱ्या तक्रारी त्वरित निकाली निघणे आवश्यक आहे. सदर दिवशी तक्रार येऊन येणाऱ्यांशी आत्मियतेने संवाद साधण्यासोबतच त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेतले पाहिजे. ज्या तक्रारी तातडीने निकाली निघणे अपेक्षित आहे त्या शक्यतो आठवडयाच्या आत निकाली काढा. केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधितांना द्या, अशा सुचना जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधिक्षक संजय दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, राजेश अडपावार, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके, राज्य उत्पादन विभागाचे अधिक्षक पराग नवलकर, वीज वितरणचे अधिक्षक अभियंता बाबासाहेब जाधव, भूमी अभिलेखचे अधिक्षक एस.एस.इंगळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी राम कडू, कार्यकारी अभियंता महाजन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकशाही दिनात आपल्या तक्रारी घेऊन नागरीकांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच संबंधित विभागाशी संबंधित असलेल्या तक्रारी त्या-त्या विभागाने लक्ष घाऊन निकाली काढाव्या, अशा सुचना केल्या. यावेळी महसूल, जिल्हा परिषद, भूसंपादन, पोलिस, वीज वितरण कंपनी आदी विभागाशी संबंधीत तक्रारी दाखल झाल्या. (प्रतिनिधी)