पूल बांधकामाला मुहूर्तच मिळेना

By Admin | Updated: December 9, 2015 02:54 IST2015-12-09T02:54:39+5:302015-12-09T02:54:39+5:30

गेल्या १० वर्षांपासून कुंभा-दहेगाव रस्त्यावरील बेंबळा कालवा ओलांडणी पुलाचे बांधकामाचे भिजत पडले आहे.

Get the bridge construction first | पूल बांधकामाला मुहूर्तच मिळेना

पूल बांधकामाला मुहूर्तच मिळेना

१० वर्षे लोटली : सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता अद्याप कायम
मारेगाव : गेल्या १० वर्षांपासून कुंभा-दहेगाव रस्त्यावरील बेंबळा कालवा ओलांडणी पुलाचे बांधकामाचे भिजत पडले आहे. मागीलवर्षी या पुलाचे बांधकाम मंजूर होऊन एजन्सी निश्चित झाली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलाच्या बांधकामासाठी अद्याप मुहूर्तच मिळाला नाही.
गेल्या १० वर्षांपासून कुंभा-दहेगाव रस्त्यावरील बेंबळा कालवा ओलांडणी पुलाचे बांधकाम रखडले आहे. नियोजित बांधकामासाठी तयार केलेल्या वळण रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे दर पावसाळ्यात या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. या रस्त्याने ये-जा करणारे व वाहन चालक कमालीचे त्रस्त होतात. याबाबत ‘लोकमत’मधून सदर पूल ‘बांधाल तेव्हा बांधा’, पण वळण रस्त्यावरील खड्डे बुजवा’, असे वृत्त छायाचित्रासह प्र्रकाशित करण्यात आले होते.
बांधकाम विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेत या पावसाळ्याच्या प्रारंभी जेसीबी आणि टिप्पर पाठवून रस्त्यावर पडलेला खड्डा कसातरी बुजविला. परिणामी रस्त्यावर साचलेले पाणी कालव्यात काढून देण्यात आले. मात्र सदर जेसीबी आणि टिप्पर अद्याप परत का नेले नाही, असा प्रश्न आहे. ती वाहने अद्याप त्या जागी बेवारस का उभी आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही महागडी वाहने कोणाची व याठिकाणी बेवारस का सोडली, असा प्रश्न चर्चेला जात आहे. या वाहनांमुळे अपघात घडण्याचीही शक््यता बळावली आहे. गेल्या १० वर्षांपूर्वीच या पुलाचे बांधकाम मंजूर झाले होते. तथापि सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या संबंधित अभियंत्याच्या दुर्लक्षितपणाने बांधकाम करण्यात आले नाही. नंतर साहित्याच्या किमती वाढल्याने बांधकाम अवाक्याबाहेर गेले. सुज्ञ अभियंत्यांनी पुलाचे बांधकाम न घेता वळण रस्ता घेऊन याच कालव्यावर बांधालेल्या पुलावरून वाहतूक होऊ शकते, असा पवित्रा घेतला. मात्र नागरिकांनी तो हाणून पाडला. यानंतर त्याच जागी ‘फुट ब्रीज’ची कल्पना समोर आली. त्यावेळी संबंधित अभियंताचा शहाणपणा पुन्हा लक्षात आला. आता विलंबाने का होईना एक वर्षापूर्वी या ठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामास मंजुरी मिळाली. ‘ई-टेंडरींग’ झाले. कंत्राटदार निश्चित झाल. मात्र पुलाच्या बांधकामाचे घोडे कुठे अडले, हेच कळायला मार्ग नाही. आता पुलाच्या बांधकमाची नियोजित जागा बदलविल्याने धोकादायक वळण रस्ता तयार होणार आहे. नागरिकांनी पुनश्च बांधकामास विरोध दर्शविला असून नियोजित जागेवरच नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)

पुलाच्या किमतीत दुप्पट वाढ

१० वर्षांपूर्वी या पुलाला मंजुरी मिळाली होती. मात्र अद्याप पुलाचे बांधकाम झाले नाही. गेल्या १० वर्षात बांधकाम साहित्याचे दर जवळपास दुप्पट झाले आहे. त्यामुळे पुलाच्या बांधणीचा खर्च दुप्पटीने वाढणार आहे. तरीही बांधकाम विभाग पुलाच्या बांधकामास सतत चालढकल करीत असल्याचे दिसून येते.

Web Title: Get the bridge construction first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.