गौतम बुद्धांचा अस्थी कलश दर्शनासाठी यवतमाळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:08 IST2018-04-30T22:08:39+5:302018-04-30T22:08:39+5:30
बुद्ध पौर्णिमेनिमित्त यवतमाळात तथागत गौतम बुध्दांच्या अस्थी असलेला कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. स्थानिक बसस्थानक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुद्ध पौर्र्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गौतम बुद्धांचा अस्थी कलश दर्शनासाठी यवतमाळात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बुद्ध पौर्णिमेनिमित्त यवतमाळात तथागत गौतम बुध्दांच्या अस्थी असलेला कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. स्थानिक बसस्थानक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुद्ध पौर्र्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता बुद्धवंदना घेण्यात आली, पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बाल श्रामणेर, भंते आणि समाजबांधव उपस्थित होते.
हिवरी येथील जेतवन पर्यटन स्थळातर्फे बालश्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या शिबिराचा समारोप सोमवारी झाला. यावेळी जेतवनचे पदाधिकारी उपस्थित होते.
बाल श्रामणेर भंतेंची रॅली आयोजित करण्यात आली होती. स्थानिक लाठीवाला पेट्रोलपंपापासून निघालेली रॅली महात्मा फुुले चौक, दत्त चौक मार्गे बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ विसर्जीत झाली. यावेळी थायलंडवरून आणलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी खीरवितरण करण्यात आले. यावेळी रवी श्रीरामे, के.एस. नाईक, बंडूपंत पोहेकर, डॉ.सुभाष डोंगरे, मधुकर भैसारे, रणधीर खोब्रागडे, जेतवनचे अध्यक्ष अनिल बनसोड, शिबिराचे आयोजक रमेश बनसोड, गौतम बनसोड आदी उपस्थित होते.