जिल्हा परिषदेत गुरूजनांच्या कार्याचा गौरव
By Admin | Updated: September 7, 2016 01:32 IST2016-09-07T01:32:24+5:302016-09-07T01:32:24+5:30
सतत नवनवीन उपक्रम राबवून ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या तब्बल ३१ गुरूंचा मंगळवारी जिल्हा परिषदेने शाल,....

जिल्हा परिषदेत गुरूजनांच्या कार्याचा गौरव
यवतमाळ : सतत नवनवीन उपक्रम राबवून ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या तब्बल ३१ गुरूंचा मंगळवारी जिल्हा परिषदेने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यात १७ जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार व १४ शिक्षकांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय प्रवेशोत्सव, जाहिरात बनवा पटसंख्या वाढवा स्पर्धेतील यशस्वी शिक्षकांचाही गौरव करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रशस्तिपत्र देऊन जिल्हा परिषदेच्या सभागृहात गौरविण्यात आले. यात गजानन तुरारे, रामभाऊ बोलवार, चंद्रशेखर तिखे, कैलास गव्हाणकर, महादेव निमकर, गोविंद घाडगे, विजय जाचक, विनोद डंभारे, आमिन चव्हाण, विजय कडू, गणेश अर्जापुरे, देविदास बोंडे, गणेश निकोले, वंदना केने,
फरीद अहमद खान रशीद खान, प्रशांत गवळी, तर माध्यमिकच्या विणा
सुनील शहाडे यांचा गौरव करण्यात आला.
याशिवाय किसन भुरके, प्रसाद देशपांडे, विजय विश्वकर्मा, नंदू चव्हाण, जगदीश खाडे, संजय गडपायले, गजानन भगत, घनश्याम पाटील, शंकर इंगळे, कमलकिशोर कदम, पुष्पा गेडाम, सुरेश कुंभलकर, गणपत गाऊत्रे आणि मोरेश्वर पुंडशास्त्री यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
या सर्वांना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, समाज कल्याण सभापती लता खांदवे, महिला व बालकल्याण सभापती विमल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर आदींच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला विविध विभाग प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कुटुंबीय, शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
गुणवंत विद्यार्थी, विजेत्यांचा सन्मान
याच कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळांतील दहावी आणि बारावीतील २७ गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच तंबाखूमुक्ती निबंध लेखन स्पर्धेतील विजेते वासुदेव सोनिराम बोडखे यांना प्रथम, अर्चना वासेकर यांना दिव्तीय, तर सीमा दामोधर पोटदुखे व अजाब खडसे यांना विभागून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय प्रतिमा खडतकर, सरदेश दुर्गे, गणेश चव्हाण यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. यासोबतच पटसंख्या वाढविण्यासाठी ‘जाहिरात बनवा’ स्पर्धेतील विजेते व शाळेच्या पहिल्या दिवशी यशस्वी प्रवेशोत्सव राबविणाऱ्या ४४ शाळांचाही सन्मान करण्यात आला.