ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे गौरव सोहळा

By Admin | Updated: January 19, 2017 01:00 IST2017-01-19T01:00:03+5:302017-01-19T01:00:03+5:30

ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळातील ज्येष्ठ सभासदांचा शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.

Gaurav Ceremony of Senior Citizen Mandal | ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे गौरव सोहळा

ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे गौरव सोहळा

यवतमाळ : ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळातील ज्येष्ठ सभासदांचा शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. तसेच कॅरम स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. येथील ज्येष्ठ नागरिक भवनात हा कार्यक्रम घेण्यात आला.
नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. माजी खासदार सदाशिवराव ठाकरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, नगरसेवक मनोज मुधोळकर, संगीता सव्वालाखे, प्रमोद गाडबैले आदी उपस्थित होते. वसुधा पांडे यांनी स्वागतगीत तर सुरेश भिरंगी यांनी मंडळाचे ‘खरा तो एकची धर्म’ हे प्रार्थना गीत सादर केले. मंडळाचे अध्यक्ष बळवंतराव चिंतावार यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. सचिव भाऊराव वाकडे यांनी मंडळाच्या गतवर्षीच्या कार्याचा आढावा घेतला. प्रशांत कदम यांनी पर्यावरण संरक्षण, सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनावरील चित्रफितीचे प्रक्षेपण केले. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. संचालन मंडळाचे सहसचिव विजय उपलेंचवार यांनी केले.
दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मानवसेवा समितीचे अध्यक्ष तथा मंडळाचे सदस्य अ‍ॅड. गोपाळराव जायले होते. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते. या सत्रात कॅरम स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. संचालन वसंत पांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी अरविंद डगावकर, विठ्ठल व्यवहारे, विजय गंगमवार, श्रीराम भास्करवार, विनोद सहस्त्रबुद्धे, वासुदेव कांबळे, शीला कांबळे, प्रकाश दामले, नीळकंठ वानखेडे, शुभांगी सहस्त्रबुद्धे, राजन टोंगो, दिगंबर चिंतलवार आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

Web Title: Gaurav Ceremony of Senior Citizen Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.