फकिरजी महाराज संस्थानचा गौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:50 PM2018-09-19T22:50:56+5:302018-09-19T22:51:11+5:30

फकिरजी महाराज संस्थानतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव सोहळा घेण्यात आला. नेरचे तहसीलदार अमोल पोवार अध्यक्षस्थानी होते. गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

Gaurav Ceremony of Fakirji Maharaj Institute | फकिरजी महाराज संस्थानचा गौरव सोहळा

फकिरजी महाराज संस्थानचा गौरव सोहळा

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांना गौरविले : माणिकवाडा येथे विद्यार्थी, डॉक्टर, पोलीस अधिकारी सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्क
धनज माणिकवाडा : फकिरजी महाराज संस्थानतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव सोहळा घेण्यात आला. नेरचे तहसीलदार अमोल पोवार अध्यक्षस्थानी होते. गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. धनंजय जोल्हे, नेरचे ठाणेदार अनिल किनगे, प्राचार्य उदय कानतोडे, मुख्याध्यापक बोकडे, सरपंच शहीन शहा, शिवसेना नेर तालुका प्रमुख मनोज नाल्हे, पोलीस पाटील नीलेश गोल्हर, वैशाली ठाकरे, माजी विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गोल्हर, संस्थानचे अध्यक्ष देवीदास कावलकर, मुख्याध्यापक जोल्हे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात हर्षदा फोफसे, आचल वानखडे, स्वाती पवार, यश पाटेकर, दीशा राऊत, तमन्ना गाऊत्रे, उन्नती चरडे, प्रज्योती कावलकर, नीखिल बोरूले, साक्षी हुड, अभय ढोमणे, साक्षी गायकवाड, नेहा जेंगठे, सेजल हुड, अजय भांगे, छकुली गायकवाड, शिशा परवीन शेख कलाम, सोनाली जाधव, भूषण पारधी, मिर्झा तबस्सूम परवीन शफी बेग, प्रीतिश ठाकरे, शिवम जगताप, वैभवी फोफसे, शहा तयुसलीन शहेन, साक्षी फिरके, तेजस वानखडे, योगिनी घावडे, अनम अरशद बेग मिर्झा, श्रृती फिरके, ऋतुजा नाल्हे, रितेश सोहर, सायमा परवान गफ्फार शेख, शमा पठाण, फिजा अंजूम रज्जाक शेख या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
शेतकरी विलास खवले, लुमदेव शेंडे, तसेच धनज व माणिकवाडा या गावात दारूबंदीसाठी सहकार्य केल्याबद्दल ठाणेदार अनिल किनगे, आचार्य पदवीबद्दल प्रा.डॉ. धनंजय जोल्हे यांना संस्थानतर्फे सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थानचे सचिव रवींद्र बोबडे, संचालन प्रवीण तिखे यांनी केले. आभार विश्वस्त संदीप लुणावत यांनी मानले.
या सोहळ्यासाठी प्रा. चंद्रशेखर गोल्हर, सतीश फिरके, नीलेश चौधरी, प्रा. सुरेश पेन्शनवार, प्रा. उदय कानतोडे, प्रा. बन्सोड, रवींद्र बोबडे, प्रांजली बारस्कर, संजय इंगळे, नरेश घावडे, श्रीनिवास गोल्हर, अशोक दहेकर, जयश्री दहेकर, हरिश मेश्राम, अजीम शहा, शैलेश हुड, गजानन नेमाडे, अर्चना कावलकर आदींचे सहकार्य लाभले.

Web Title: Gaurav Ceremony of Fakirji Maharaj Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.