सुन्ना येथील नागरिकांना वनविभागाकडून गॅस वाटप
By Admin | Updated: May 31, 2015 02:17 IST2015-05-31T02:17:18+5:302015-05-31T02:17:18+5:30
ग्राम परिसर विकास समिती सुन्नाच्यावतीने शुक्रवारी सुन्ना येथील १५० लोकांना गॅस व शेगडीचे वाटप या विभागाचे आमदार राजू तोडसाम यांच्याहस्ते करण्यात आले.

सुन्ना येथील नागरिकांना वनविभागाकडून गॅस वाटप
पाटणबोरी : ग्राम परिसर विकास समिती सुन्नाच्यावतीने शुक्रवारी सुन्ना येथील १५० लोकांना गॅस व शेगडीचे वाटप या विभागाचे आमदार राजू तोडसाम यांच्याहस्ते करण्यात आले. तत्पूर्वी सुन्ना या गावात २००, कोपा मांडवी या गावात ९४, अंधरवाडी या गावात ३७, कोब्बई या गावात ४०, सुसरी येथे ८२, बोथ येथे १७६ व टेंभी या गावात ६२ गॅस व शेकडीचा संच टिपेश्वर अभयारण्यातर्फे वाटप करण्यात आला.
आतापर्यंत सुन्ना या गावात एकूण ३५० लोकांना वन्यजीव पांढरकवडा विभागातर्फे गॅस वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, सहाय्यक वनसंरक्षक आर.एस. बोराडे, वनपरिक्षेत्र अधिकारी जी.बी. लांबाडे, सुन्ना येथील मदन जिड्डेवार, मोहन मामीडवार, ग्राम परिसर विकास समितीचे अध्यक्ष संतोष जिड्डेवार तसेच ग्रामस्थ वनपाल, वनरक्षक हजर होते.
कार्यक्रमासाठी वनरक्षक आरती भसारकर, वनमजूर खडसे, शिक्षिका कुमरे, डी.बी. मसराम आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधीे)